मुंबई: चीनी मोबाइल कंपनी शाओमीच्या स्मार्टफोनला भारतात सर्वाधिक पसंती मिळते आहे. नुकताच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार जवळजवळ 26 टक्के लोकांची पहिली पसंती शाओमीला आहे. स्ट्रेटॅजिक अॅनालिटिक्स आयएनसीनं हा सर्व्हे केला आहे.
अॅपल आणि सॅमसंगलाही टाकलं मागे:
या सर्व्हेनुसार, नवा स्मार्टफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी शाओमीला पहिली पसंती दिली आहे. तब्बल 26 टक्के मतं मिळवतं शाओमी पहिल्या क्रमांकावर आहे. तर 12-12 टक्के लोकांनी सॅमसंग आणि अॅपलला मतं दिली आहेत. तर लेनोव्हो आणि मोटोरोलाला 6 आणि 7 टक्के मतं मिळाला आहेत.
अँड्रॉईड स्मार्टफोन मार्केट शेअरमध्ये शाओमी दुसऱ्या क्रमांकावर:
2014 साली शाओमीनं भारतीय बाजारात प्रवेश केला होता. या सर्व्हेनुसार, अँड्रॉईड स्मार्टफोन मार्केट शेअरच्या बाबतीत शाओमी 16 टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 18 टक्के शेअरसोबत सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे. तर लेनोव्हो आणि मोटोरोलाला 11-11 टक्के मिळाले आहेत. तर मायक्रोमॅक्सला 9 टक्के मिळाले आहेत.
संबंधित बातम्या:
सोशल मीडियात एबीपी माझाचा दबदबा, फेसबुकवर 30 लाख लाईक्स!
रिलायन्स जिओ 4G लॅपटॉप बनवणार?
सॅमसंगचा गॅलक्सी J3 बजेट स्मार्टफोन भारतात लाँच
फेसबुक, व्हॉट्सअॅपवर केंद्र सरकारकडून निर्बंध येण्याची शक्यता
सौर उर्जेवर चार्ज होणारी पॉवर बँक लाँच, किंमत 599 रु.
रिपोर्ट : भविष्यातही जिओ इतर कंपन्यांसाठी धोकादायक