Oppo A57e Launch : बजेट फ्रेंडली आणि तरूणांचा सर्वाधिक आवडता स्मार्टफोन ओप्पो Oppo नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे अपडेट केलेले स्मार्टफोन घेऊन येत असतो. नुकताच Oppo स्मार्टफोन भारतात 15,000 पेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. थोडक्यात, हा स्मार्टफोन अगदी Oppo A57 सारखाच आहे. हा कंपनीचा नवीनतम बजेट फेंडली स्मार्टफोन आहे, जो ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर हा Oppo A57 स्मार्टफोन सारखाच आहे. Oppo A57e मध्ये HD plus डिस्प्ले आहे आणि प्राथमिक लेन्स 13 मेगापिक्सेल असून ड्युअल रियर कॅमेरा आहे. ह्याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, ह्यात 5000mAh ची बॅटरी आहे. आणि याशिवाय Oppo A57e मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी का विशेष आहे ते पाहा. 


Oppo A57e ची भारतात किंमत :


नवीन स्मार्टफोन Oppo A57e ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू झाली आहे. जी फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आहे. Oppo कंपनीने या स्मार्टफोनचे 2 कलर ऑप्शन दिले आहेत. ब्लॅक आणि ग्रीन या दोन कलर ऑप्शनमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 


Oppo A57e चे स्पेसिफिकेशन्स :



  • Android 12

  • 128 GB स्टोरेज

  • 5000mAh बॅटरी

  • 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट

  • MediaTek Helio G35 प्रोसेसर

  • 4 जीबी रॅम

  • 6.56 इंच HD प्लस IPS LCD डिस्प्ले

  • ड्युअल रियर कॅमेरा सेटअप


Oppo A57e कॅमेराबद्दल माहिती :


Oppo A57e स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि या कॅमेऱ्यातील फोटोग्राफीसाठी प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल्सचा आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सल्सचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. यामध्ये नाईटस्केप सेल्फी मोड देखील आहे.


Oppo A57e स्मार्टफोनची बॅटरी कशी असेल?


या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh आहे, सोबत तुम्हाला 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth v5.2, USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक आहे. 


महत्वाच्या बातम्या :