Diwali 2020 Sale : जर या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही संधी तुम्ही अजिबातच सोडू नका. स्वतःसाठी किंवा आपल्या एखाद्या खास व्यक्तीला या दिवाळीत तुम्ही स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरु आहे. अॅपल, सॅमसंग, मोटोरोला यांसारख्या मोठ्या ब्रँड्सवर 40 हजार रूपयांपर्यंतची मोठी सूट मिळत आहे. आयफोन असो किंवा सॅमसंग गॅलक्सी नोट 10 सर्वच फोन्सवर बंम्पर डिस्काउंट मिळत आहे. ऑफरसोबतच बँक कॉर्ड्सवर एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जात आहे. आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन सेलमधील सर्वात शानदार ऑफर्सबाबत सांगणार आहोत.


Apple iPhone SE 2020 : फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये याचवर्षी लॉन्च करण्यात आलेल्या iPhone SE 2020 वर 9,501 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. 42,500 रूपये किंमतीत लॉन्च करण्यात आलेल्या हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहात. या फोनच्या 64GB मॉडेलवर 14,350 रुपयांची एक्सेंज ऑफर दिली जात आहे. याव्यतिरिक्त ईएमआय आणि बँक कार्ड ऑफर्सही देण्यात येत आहेत. ज्यामध्ये एक्सिस बँक कार्ड असणाऱ्यांना 1,500 रूपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.


Motorola Razr 2019 : फोल्डेबल स्मार्टफोन मोटोरोला रेजर स्मार्टफोनवर 40,000 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये हा फोन 84,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. याची मूळ किंमत 1,24,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सेलमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. याचसोबत कंपनी 14,500 रुपयांची एक्सेंज ऑफर आणि 2,542 रुपये प्रति महिन्याच्या दराने नो-कॉस्ट ईएमआयची ऑफरही युजर्सना देत आहे.


Samsung Galaxy S20+ : 2020 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोनच्या किंमतीमध्ये 24,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये (8GB RAM + 128GB) युजर्सना खरेदी करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन आधी 73,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आला होता. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खेरदीवर 14,850 रूपयांची एक्सेंज ऑफरही देण्यात येऊ शकते. जर तुम्ही फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्लान घेतला असेल, तर तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंटही देण्यात येणार आहे.


Samsung Galaxy Note 10+ : हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 59,999 (12GB RAM + 256GB) रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. याची किंमत 79,999 रुपये आहे. फोनवर 20,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या फोनच्या खेरदीवर फ्लिपकार्ट युजर्सना 14,580 रुपयांपर्यंतचा एक्सेंज ऑफर देत आहे. सॅमसंगच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर नो-कॉस्ट ईएमआयही देण्यात येत आहे.


Samsung Galaxy M51 : सॅमसंगच्या या मिड बजट स्मार्टफोनवर 2,500 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देण्यात येत आहे. या फोनमध्ये 7,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. अॅमझॉन सेलमध्ये या स्मार्टफोनवर तुम्ही हा फोन 24,999 रुपयांऐवजी 22,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त सिटी बँक, कोटक बँक आणि आयसीआयसीआय कार्ट धारकांसाठी 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंटही दिला जात आहे. अशाप्रकारे तुम्ही हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खेरदी करु शकता.


Realme Narzo 20 Pro : या बजेट स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट सेलमध्ये डिस्काउंट ऑफर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB RAM + 64GB व्हेरियंट 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन 6.5 इंचांच्या फुल एचडी प्लस डिस्प्ले पॅनलसोबत येतो. यामध्ये MediaTek Helio G95 SoC प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये 4,500mAh बॅटरी आणि 65W ची सुपरडार्ट फास्ट चार्जिंग फिचर आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :