iphone 12 : अमेरिकेतील दिग्गज आयफोन टेक कंपनी Apple ने आयफोन 12 (iphone 12) सीरीजचे चार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीच्या iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max ची प्री-बुकिंग भारतात सुरु झाली आहे. यावेळी iPhone 12 वर 63 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जुना आयफोन किंवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन एक्सेंज केल्यानंतर कंपनी ही ऑफर देत आहे.


अॅपल कंपनीच्या वतीने एक लिस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये यासंदर्भात अधिक माहिती दिली गेली आहे. यादीमध्ये कंपनीने जुना आयफोन किंवा अॅन्ड्रॉइड फोनवर किती डिस्काउंट मिळू शकेल याची माहिती दिली आहे. या ट्रेड-इन ऑफरचा फायदा सिलेक्टेड ऑफिशिअल अॅपल स्टोअरला मिळणार आहे. खास गोष्ट म्हणजे, अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन्सच्या तुलनेत युजर्सना मोठा डिस्काउंट मिळू शकतो. सॅमसंग आणि वनप्लसचे स्मार्टफोन एक्सचेंज केल्यानंतर 11 हजारांपासून 36 हजारांपर्यंतची ट्रेड-इन वॅल्यू मिळू शकते.



iPhone 12


Apple ने iPhone 12 ब्लू, रेड, ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन रंगांच्या ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. iPhone 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. अॅपलने दावा केला आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वश्रेष्ठ स्क्रीन आहे. iPhone 12 मध्ये ड्यूअर कॅमेरा आहे. iPhone 12 मध्ये सिरेमिक शील्ड लावण्यात आलं आहे. iPhone 12 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP वाइड अँगल लेन्स आहे. iPhone 12 चा कॅमेरा कमी उजेडातही चांगले फोटो काढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कंपनीने नाइट मोडमझ्ये सुधारणा केल्या आहेत. iPhone 12 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे.


iPhone 12 mini


अॅपलने iPhone 12 mini लॉन्च केला आहे. आयफोन मिनीला 5.4 आणि 6.1 इंचाची स्क्रिन साइज असणारा व्हेरियंटसोबत मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. अॅपलने दावा केला आहे की, हा जगातील सर्वात स्लिम, स्मॉल आणि फास्ट 5 जी स्मार्टफोन आहे. यामध्ये iPhone 12 चा प्रोसेसर देण्यात आला आहे आणि सर्व फिचर्सही iPhone 12मधीलच असणार आहेत. भारतात iPhone 12 mini चे 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 69,990 रुपये आहे. तर याच्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 74,900 रुपये आणि टॉप-अँड 256 जीबी स्टोरेज
ऑप्शनची किंमत 84,900 रुपये आहे.


iPhone 12 Pro


Apple चा iPhone 12 Pro मॉडल 6.5 इंचाच्या स्क्रिनसोबत लॉन्च केला आहे. तर प्रो मॅक्स 6.7 इंचाच्या रॅटिना डिस्प्लेसोबतच लॉन्च केला आहे. iPhone 12 Pro 12MP अल्ट्रावाइड + 12 वाइड अँगल लेंस + 12 टेलिफोटो लेंस आहे. यामध्ये डिप फ्यूजन कॅमेरा फिचरही आहे. iPhone 12 Pro ची सुरुवातीची किंमत 119900 रुपये आहे.


iPhone 12 Pro Max


Apple चा iPhone 12 Pro Max मॉडल 6.7 इंचाच्या रॅटिना डिस्प्लेसोबत लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 1284 x 2778 pixels आणि 19.5:9 ratio मध्ये डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 6 GB रॅमसोबत तीन मेमरी स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये 128GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM, 256GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM, 512GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM च्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार आहे.