नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी लोकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने सर्व खाजगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 22 मार्चला नरेंद्र मोदींना 'जनता कर्फ्यु' पाळण्याचं आवाहन केलं आहे. अशातच जियोने लोकांना वर्च्युअली कनेक्ट ठेवण्यासाठी आपल्या पॅक्समध्ये इंटरनेट डाटा दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. जियोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, यामुळे लोकांना घरीच थांबवून ठेवण्यास मदत होईल.
जाणून घ्या कोणत्या पॅकमध्ये मिळणार दुप्पट डाटा जियोच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना दुप्पट डाटा बुस्टर म्हणून मिळणार आहे. याचाच अर्थ जर तुम्ही आधीपासूनच एखादा पॅक वापरत असाल आणि त्याचा डेली हायस्पीड डाटा खर्च होत असेल तुम्ही या पॅकचा वापर करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला दररोज 1.5 जीबी हायस्पीड डाटा मिळत असेल. हा सर्व डाटा संपल्यानंतर तुम्ही या पॅक्सचा वापर करू शकता. या डबल डाटा प्लानची वॅलिडिटी तुम्ही आधीपासूनच वापरत असलेल्या प्लॅननुसार असणार आहे. जियोच्या पॅक्ससोबतच तुम्हाला नॉन-जियो नंबर्सवरही कॉलिंग मिनिट्स मिळणार आहेत. नॉन जियो नंबर्सवर कॉल करण्यासाठी तुम्हाला 75, 200, 500 आणि 1000 मिनिटांची कॉलिंग सुविधाही मिळणार आहे.
जियो पॅकची किंमत आधी मिळणारा डाटा  आता मिळणारा डाटा
11 400 एमबी 800 एमबी
21 1 जीबी 2 जीबी
51 3 जीबी 6 जीबी
101 6 जीबी 12 जीबी
याव्यतिरिक्त सरकारी टेलिकॉम कंपनीने घरातूनच काम करणाऱ्या लोकांसाठी 'वर्क फ्रॉम होम' प्लान लॉन्च केला आहे. कंपनीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्यांच्याकडे कंपनीचं ब्रॉडबँड कनेक्शन नाही पण लँडलाइन असेल तर ते या ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात. संबंधित बातम्या :  Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! देशात 236 कोरोना बाधित, तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू Coronavirus | महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर : आरोग्यमंत्री राजेश टोपे