मुंबई : व्हॉट्सअॅपने आपलं डार्क मोड फिचर सर्व अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी अपडेट केलं आहे. व्हॉट्सअॅपचं डार्क मोड फिचर यूज करण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट वर्जन डाउनलोड करावं लागेल किंवा अपडेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हीही आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप फिचरचा वापर करू शकता. व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, डार्क मोड फिचरच्या मदतीने यूजर्सना व्हॉट्सअॅप यूज करताना डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही. तसेच मोबाइलचा ब्राइटनेसचा कमी वापर करावा लागेल.
व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, 'एन्ड्रॉइड 10 आणि आयओएस 13 चे यूजर्स याला डिफॉल्ट म्हणूनही सेट करू शकतात. तसेच मीडिया रिपोर्टनुसार असं दिसून आलं आहे की, सध्या काही लोक व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतरही हे फिचर वापरू शकत नाहीत.
आयओएस आणि अॅन्ड्रॉइड 10 यूजर्स असं वापरू शकतात हे फिचर :
- सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन अपडेट/डाऊनलोड करा.
- त्यानंतर 'मोबाइल सेटिंग्स' हा ऑप्शन सिलेक्ट करा.
- येथे डिस्प्ले आणि ब्राइटनेसचा ऑप्शन सिलेक्ट करा.
- त्यानंतर डार्क मोड सुरू करा.
- मोबाइलमध्ये डार्क मोड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर व्हॉट्सअॅप डार्कमोडचं फिचर मोबाइलमध्ये अॅक्टिव्हेट होइल.
अॅन्ड्रॉइड 9 आणि त्याआधीचं अॅन्ड्रॉइडचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी
- सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन डाउनलोड करा किंवा अपडेट करा.
- त्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जा.
- त्यानंतर चॅटमध्ये जाऊन थीम ऑप्शन सिलेक्ट करा.
- डार्क मोड ऑप्शन सिलेक्ट करा.
संबंधित बातम्या :
व्हॉट्स अॅपवरील चुकून डिलीट झालेले मेसेज 'असे' मिळवा परत