मुंबई : जवळपास दोन महिन्यांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आसूसने 2016 मधील जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. जेनफोन 3 सीरीजचे एकूण चार स्मार्टफोन आसूसने भारतीय ग्राहकांसाठी आणले आहेत. यामध्ये जेनफोन 3, जेनफोन 3 डिलक्स, जेनफोन 3 अल्ट्रा आणि जेनफोन लेजर यांचा समावेश आहे.
किंमत किती?
जेनफोन 3 स्मार्टफोनची किंमत 21 हजार 999 रुपये असून, त्याची विक्री आजपासूनच सुरु झाली आहे. तर जेनफोन लेजर, जेनफोन 3 डिलक्स आणि जेनफोन 3 अल्ट्रा पुढील महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध होतील. जेनफोन लेजरची किंमत 18 हजार 999, जेनफोन 3 डिलक्स, जेन्फोन 3 अल्ट्रा स्मार्टफोनची किंमत 49 हजार 999 रुपये आहे.
फीचर्स :
जेनफोन 3 – 5.5 इंचाचा एचडी 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, IMX298 सेन्सर, 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, Qualcomm Snapdragon 625 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज, 3000mAh क्षमतेची बॅटरी इत्यादी.
जेनफोन 3 लेजर – 5.5 इंचाचा 2.5D कव्हर्ड 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज, 13 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमरा इत्यादी.
जेनफोन 3 अल्ट्रा - 6.8 इंचाचा एचडी 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, सोनीचा IMX298 सेन्सरचा 23 मेगापिक्सेल रियर कॅमरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमरा, Qualcomm Snapdragon 652 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज, 4600mAh क्षमतेची बॅटरी इत्यादी.
जेनफोन 3 डिलक्स – 5.7 इंचाचा एचडी 1920x1080 पिक्सेल रिझॉल्युशन स्क्रीन, सोनीचा IMX298 सेंसर असणारा 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमरा, Qualcomm Snapdragon 820 प्रोसेसर, 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज, 3000mAh क्षमतेची बॅटरी इत्यादी.