मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते बनले आहेत.


बराक ओबामा यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आजपासून संपला आहे. त्यामुळे सर्वाधिक फॉलोअर्स असलेला राजकीय नेता म्हणून ओबामांच्या जागी मोदींचा नंबर लागला आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा आजपासून डोनाल्ड ट्रम्प स्वीकारणार आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मोदींचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स सर्वाधिक आहेत.

ट्रम्प यांना ट्विटरवर 2 कोटी 4 लाख फॉलोअर्स आहेत.  ओबामांचे ट्विटरवर 8 कोटी 7 लाख 17 हजार फॉलोअर्स आहेत.

तर पंतप्रधान मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 2 कोटी 64 लाख 78 हजार आहे.

दुसरीकडे ओबामांच्या फेसबूक पेजच्या लाईक्सची संख्या 5 कोटी 28 लाख आहे.

तर मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स 3 कोटी 92 लाख आहेत. याशिवाय मोदींचे गुगल प्लसवर 30 लाख, लिंक्ड इनवर 19 लाख, इन्स्टाग्रामवर 50 लाख आणि यूट्यूबवर 5.91 लाख फॉलोअर्स आहेत.