मुंबई: चीनी मोबाइल कंपनी शाओमीनं आज भारतात आपला नवा स्मार्टफोन रेडमी नोट 4 लाँच केला. शाओमीच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत 9,999 रु. आहे. हा स्मार्टफोन रेडमी नोट 3चं अपग्रेडेड व्हेरिएंट आहे.
शाओमी नोट 4मध्ये 5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याची बॅटरी. याची बॅटरी क्षमता तब्बल 4100 mAh आहे. क्वॉलकॉम चिपसेटमुळे बॅटरी आणि बॅकअप जास्त मिळू शकेल. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर आणि इन्फ्रारेड सेन्सरही देण्यात आला आहे.
शाओमीनं रेडमीचे तीन व्हेरिएंट लाँच केले आहेत. 2 जीबी रॅमसोबत 32 जीबी इंटरनल मेमरी व्हेरिएंटची किंमत 10,999 रु. आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी व्हेरिएंटची किंमत 12,999 रु. आहे.
शाओमीच्या या स्मार्टफोनचा 23 जानेवारीपासून फ्लॅश सेल फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे.