नवी दिल्ली : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा पुन्हा एकदा चोरी झाला आहे. सायबर सिक्युरिटी फर्म कम्पुरेटेक यांनी ही माहिती दिली आहे. फेसबुकचा हा डेटा बेकायदेशीर स्क्रॅपिंग ऑपरेशन किंवा फेसबुक एपीआय वापरुन एकत्रित केला गेला आहे. संशोधकांना एक डेटाबेस सापडला ज्यात 267 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा आहे. विशेष म्हणजे, या माहितीला कोणताही पासवर्ड नाहीये. यात फेसबुक यूजर्सचा आयडी, फोन नंबर आणि वापरकर्त्याचं पूर्ण नावं आढळली आहेत.


कोट्यवधी डॉलर्स दंड भरुन अनेकदा माफी मागून फेसबुकने वापरकर्त्यांच्या डेटाबाबत सावधगिरी बाळगण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना फेसबुकच्या 267 दशलक्ष वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला आहे. त्यापैकी बहुतेक अमेरिकेतले आहेत. डेटाबेसमधील माहिती मोठ्या प्रमाणात एसएमएस स्पॅम आणि फिशिंग मोहिमेसाठी वापरली जाण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे, हा डाटा मागील काही वर्षांचा असण्याची शक्यता आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच युजर्सची माहिती सुरक्षित राहावी म्हणून बरेच बदल केल्याचे फेसबुकने एएफपीला सांगितले आहे.

हेही वाचा - गुगल अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाईंना 2400 कोटी डॉलरचे पॅकेज

स्मार्टफोन मधूनही डेटाची होते चोरी
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरासोबत खासगी डेटा चोरी होण्याची शक्यताही वाढली आहे. स्मार्टफोनमध्ये जवळपास सर्वच सोशल मीडिया अॅपमध्ये आपलं लॉगइन असतं. सोबतच वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण स्मार्टफोनद्वारे करत असतो. यात विविध अॅप्सचाही समावेश आहे. यातील बऱ्याच अॅपद्वारे आपली खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Internet Shutdown | इंटरनेट शटडाऊन करण्यात भारताचा पहिला नंबर!

यावर उपाय काय?
आपल्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग्समध्ये जाऊन Sync चा पर्याय ऑफ केला पाहिजे. Sync या पर्यायामुळे फोनमध्ये असलेली सर्व माहिती सोशल मीडिया अॅपला जोडली जाते. स्मार्टफोनमधून अनावश्यक अॅप्स डिलीट करुन टाका. कोणतेही नवीन अॅप इन्स्टॉल करण्याच्या आधी त्याबद्दल खात्री करुन घ्या. कोणत्याही थर्डपार्टी अॅपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉगइन करु नये.

मोबाईल कंपन्यांच्या दरवाढीबाबत ग्राहकांना काय वाटतं? | ABP Majha