मुंबई : गूगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट इंकचे सीईओ सुंदर पिचाई यांना 240 मिलीयन डॉलरचे पॅकेज देण्यात येणार आहे. मात्र सुंदर पिचाई यांना हे पॅकेज पुढील तीन वर्षात आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर मिळणार आहे. सर्च इंजिन गुगलमध्ये आतापर्यंत कोणत्याही सीईओला दिलेले हे सर्वांत मोठे पॅकेज ठरले आहे.
तर पिचाई यांना 2020 च्या सुरुवातीला दोन मिलियन म्हणजे 20 लाख डॉलरचे पॅकेज देण्यात येणार आहे. एवढच नाही तर एस अॅमेज पी 100 इंडेक्समध्ये अल्फाबेटने चांगली कामगिरी केल्यास सुंदर पिचाई यांना 90 मिलियन डॉलर अतिरिक्त देण्यात येणार आहे.
47 वर्षीय पिचाई यांची गेल्या महिन्यात या पदासाठी निवड करण्यात आली होती. गूगलचे सहसंस्थापक लैरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पिचाई यांनी पदभार स्वीकारला होता. पिचाई यांना या अगोदर देखील अशा प्रकारचे मोठे पॅकेज मिळाले आहे.
सुंदर पिचाई यांना यापूर्वीही अशाप्रकारचे मोठे पॅकेज मिळाले आहे. यापूर्वी 2016 साली देखील पिचाई यांना 200 मिलीयन डॉलरचे पॅकेज देण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्यांना देण्यात आलेले पॅकेज त्यांनी नाकारले होते. पॅकेज नाकरण्याचे स्पष्टीकरण देताना पिचाई म्हणाले, त्यांना पूर्वी पेक्षा अधिक चांगला पगार मिळत आहे.
सुंदर पिचाई यांना 2018 साली 19 लाख डॉलर एवढा पगार होता. 2004 साली पिचाई गूगलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पिचाई यांनी गूगलचे गुगलचे लोकप्रिय जीमेल, क्रोम ब्राउजर आणि अॅड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम केले आहे.
सध्या गूगल ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. 1998 साली कॅलिफोर्निच्या सिलिकॉन व्हॅलीतून गूगलने आपला प्रवास सुरू केला होता.
कोण आहे सुंदर पिचाई?
सुंदरराजन पिचाई यांचा तामिळनाडूतील मदुराईमध्ये 12 जुलै 1972 रोजी जन्म झाला होता. त्यांनी आयआयटी खडगपूरमधून बी टेक आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस केल्यानंतर अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले.
2015 साली अल्फाबेटची स्थापना
अल्फाबेट ही कंपनी 2015 साली सर्व कंपन्यांची मूळ कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली आहे. गुगलपासून वेगळे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी आणि काही महत्त्वाचे प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी अल्फाबेटची सुरुवात करण्यात आली. पिचाई आता अल्फाबेट कंपनीच्या मंडाळाचेही सदस्य झाले आहेत. स्वयंचलित कार, लाईफ सायन्सेस, साइड वॉक लॅब्स, बलूनद्वारे ग्रामीण भागात इंटरनेट, अशा गुगलच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर सुंदर पिचाई काम करणार आहेत.
गुगल अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाईंना 2400 कोटी डॉलरचे पॅकेज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2019 06:45 PM (IST)
सुंदर पिचाई यांना यापूर्वीही अशाप्रकारचे मोठे पॅकेज मिळाले आहे. यापूर्वी 2016 साली देखील पिचाई यांना 200 मिलीयन डॉलरचे पॅकेज देण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्यांना देण्यात आलेले पॅकेज त्यांनी नाकारले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -