Apple Smart Watch Feature : आयफोनप्रमाणेच (iPhone) अॅपल (Apple Smart Watch) स्मार्टवॉच देखील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये तुम्हाला असे सर्व फीचर्स मिळतात जे इतर स्मार्ट वॉचमध्ये उपलब्ध नाहीत. मग ते कॉलिंग, गाणी किंवा तुमच्या हेल्थविषयी असो, या प्रत्येक बाबतीत ते अॅडव्हान्स आहे. यामुळेच त्याची लोकप्रियता सर्वात जास्त आहे. अॅपल स्मार्टफोन यूजर्सना यातील बहुतेक फीचर्सबदद्ल माहित असेल. पण, या स्मार्टवॉचमध्ये असे एक वैशिष्ट्य आहे, ज्याबद्दल फक्त काही यूजर्सनाच याची कल्पना असेल. आज आम्ही तुम्हाला त्याच फीचरबद्दल सांगणार आहोत.
स्क्रीनशॉटचा वापर करू शकतो (Screenshot)
तुम्ही Apple Watch वरून स्क्रीनशॉट (Screenshot) देखील घेऊ शकता. कंपनीने हे फीचर आपल्या स्मार्ट वॉचमध्ये दिले आहे. मात्र, यासाठी सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ते चालू करावे लागेल. ते चालू करण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
Apple iPhone वर वॉच अॅप ओपन करा. स्क्रीनच्या तळाशी डाव्या बाजूला असलेल्या My Watch ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर General ऑप्शन दिसेल. तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल.
यानंतर स्क्रीनशॉट चालू करण्याचा ऑप्शन दिसेल. ते सुरु करा.
स्क्रीनशॉट सेटिंग चालू केल्यानंतर, तुम्ही एकाच वेळी डिजिटल क्राउन आणि साईड बटण क्लिक करून Apple Watch वरून स्क्रीनशॉट घेऊ शकाल.
तुम्ही घेतलेले स्क्रीनशॉट तुम्हाला iPhone वरील Photos अॅपमधील स्क्रीनशॉट फोल्डरमध्ये दिसतील.
तुम्ही इतर इमेजप्रमाणेच गॅलरीमध्ये हे स्क्रीनशॉट सेव्ह करू शकतात आणि शेअरही करू शकता. तसेच डिलीटदेखील करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
- अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
- पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5G नेटवर्कचं गिफ्ट!
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha