Apple iOS 16 : Apple ने अलीकडेच त्यांची नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम iOS 16 च्या फिचर्स रिलीज केले आहेत आणि कंपनीचे हे नवीनतम OS अनेक नवीन वैशिष्ट्यांसह समोर आले आहे. अॅपलने सांगितले होते की, 12 सप्टेंबरपासून iOS 16 सॉफ्टवेअर रिलीज होईल. नवीन iOS सीरीजमध्ये लॉक स्क्रीन इंप्रूवमेंट, इंप्रूव्ड फोकस मोड, नवीन iCloud शेअर केलेली फोटो गॅलरी यांसारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Apple iOS 16 अपडेटची खास वैशिष्ट्ये
iPhone युजर्स त्यांच्या आवडत्या इमोजीच्या आधारे पॅटर्न लॉक स्क्रीन तयार करू शकतात.
युजर्स विजेट्स स्क्रीनवर हवामान, वेळ आणि तारीख, बॅटरी, अपकमिंग कॅलेंडर इव्हेंट्ससारख्या इतर गोष्टी ठेवता येतील.
iPhone युजर्स आता स्क्रीनवरील त्यांच्या गॅलरीमधील फोटो वापरून त्यांची लॉक स्क्रीन कस्टमाईझ करू शकतात.
मेसेज पाठवल्यानंतर, 15 मिनिटांत ते एडिट करता येऊ शकतील.
युजर्स कोणताही मेसेज पाठवल्यानंतर दोन मिनिटांत अनसेंड करू शकतात.
विशिष्ट वेळी पाठवले जाणारे ईमेल शेड्यूल करण्याची सुविधा युजर्सना मिळत आहे.
iPhone वर iOS 16 अपडेट मिळाले की नाही? कसे ओळखाल
iPhone वर iOS 16 अपडेट मिळाले आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमच्या iPhone वर सेटिंग्ज अॅप उघडा. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि सामान्य पर्यायावर टॅप करा. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट पर्यायावर टॅप करा. तुमच्या iPhone मॉडेलला iOS 16 अपडेट मिळाले असल्यास, ते तुमच्या iPhone वर इंस्टॉल करण्याचा पर्याय मिळेल. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या iPhone 14 सीरीजला लेटेस्ट iOS 16 अपडेट मिळणार हे नक्की, पण या व्यतिरिक्त इतर कोणते डिव्हाईस उपलब्ध आहेत, ज्याला कंपनीचे नवे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट मिळेल, हे जाणून घ्या
iPhone मॉडेल ज्यांना iOS 16 अपडेट मिळणार
iPhone 14 ProiPhone 14 Pro MaxiPhone 14 PlusiPhone 14iPhone 13 miniiPhone 13iPhone 13 Pro MaxiPhone 13 ProiPhone 12 miniiPhone 12iPhone 12 Pro MaxiPhone 12 ProiPhone 11 ProiPhone 11iPhone 11 Pro MaxiPhone XS MaxiPhone XSiPhone XiPhone XRiPhone 8 PlusiPhone 8iPhone SE
संबंधित बातम्या
Apple iPhone 14 Launch: iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा
iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दं