Amazon iPhone 14 : 7 सप्टेंबरला बहुप्रतिक्षीत आयफोन 14 (iphone 14) लॉन्च झाला. त्यानंतर आता अॅमेझॉनने (Amazon) iPhone 14 वर नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरवरून तुम्ही आयफोनचे 14 चे कोणतेही मॉडेल खरेदी करू शकता. सध्या Amazon वर iPhone 14 ची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. हा आयफोन प्री बुक केल्यावर तुम्हाला 5 हजारांची सूट आणि सर्वाधिक एक्सचेंज बोनस मिळत आहे. हा आयफोन 6 कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि त्यात नवीन क्रॅश डिटेक्शन फीचर जोडण्यात आले आहे जेणेकरून अपघात झाल्यास फोन आपत्कालीन नंबरवर कॉल करता येईल.
iPhone 14 128GB (Product)
- iPhone 14 128GB मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे. HDFC बँकेच्या कार्डाने आयफोन खरेदी केल्यास थेट Rs 5 हजारांचा त्वरित कॅशबॅक आहे. आयफोनवर 13,550 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.
- आयफोनमधील दुसरा व्हेरिएंट 256GB आहे, ज्याची किंमत 89,900 रुपये आहे आणि तिसरा व्हेरिएंट 512GB आहे, ज्याची किंमत 1,09,900 रुपये आहे. आयफोनवरील बाकीच्या ऑफर्स सारख्याच आहेत.
- आयफोनमध्ये क्रॅश डिटेक्शन फीचर आहे ज्यामध्ये आयफोन मोठा कार अपघात ओळखू शकतो आणि आपत्कालीन नंबरवर आपोआप कॉल करू शकतो.
iPhone 14 मध्ये काय खास आहे?
- iPhone 14 चा स्क्रीन आकार 6.1 इंच आहे आणि त्यात सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. तसेच, त्याच्या एका व्हेरियंटमध्ये ऑलवेज ऑन स्क्रीन हे वैशिष्ट्य देखील आहे. फोनच्या स्क्रीनला टिकाऊ सिरॅमिक शील्ड आहे.
- आयफोनमध्ये प्रगत कॅमेरा प्रणाली आहे ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी प्रकाशातही स्पष्ट फोटो क्लिक करू शकता. यात लहान मुलांचे खेळ, गिर्यारोहण, चालणे किंवा कोणत्याही हालचालीचे व्हिडिओ बनवण्याचा अॅक्शन मोड आहे.
- आयफोनमध्ये खूप शक्तिशाली बॅटरी आहे ज्यामध्ये iPhone 14 20 तासांपर्यंत व्हिडिओ प्ले करू शकतो. फोनमध्ये A15 बायोनिक चिप आहे, ज्यामुळे फोन वापरताना किंवा गेमिंग करताना वेग वेगवान राहतो.
टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या :