Apple iPhone 14 Launch: दिग्गच टेक कंपनी Apple ने आपला बहुप्रतीक्षित iPhone 14 अखेर भारतात लॉन्च केला आहे. ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून या फोनच्या लॉन्चिंगची वाट पाहत होते. अखेर हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. अॅपलचा इव्हेंट कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला आहे.


Apple चे म्हणणे आहे की, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस आयफोनमध्ये सर्वोत्तम बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन A15 बायोनिक चिपवर चालतात. अॅपलने आयफोनमधील चिपचा पुनर्वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


आयफोन 14 पाच रंगांमध्ये सादर 


अॅपलचा दावा आहे की, आयफोन 14 हा सर्वात फास्ट फोन आहे. Apple iPhone 14 पाच रंगात लॉन्च करण्यात आलाआहे. यामध्ये मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल आणि रेड यांचा समावेश आहे.


सिम कार्ड स्लॉट मिळणार नाही 


यावेळी Apple ने iPhone 14 मध्ये सिम कार्ड स्लॉट ठेवलेला नाही. तो काढण्यात आला आहे. मात्र कंपनीने हे फक्त अमेरिकेत लॉन्च केलेल्या फोनसाठी केलं आहे. भारतात सिम कार्ड स्लॉट दिला जाऊ शकतो.


स्पेसिफिकेशन 



  • आयफोन 14 स्क्रीन डिस्प्ले 6.1 इंच तर आयफोन 14 प्लस स्क्रीन डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. 

  • दोन्ही आयफोन A15 बायोनिक चिपसेटसोबत उपलब्ध आहे.

  • आयफोन 14 - फ्रंट कॅमेरा आणि मेन कॅमेरा - 12 एमपीचा देण्यात आला आहे.

  • नवीन फोन 5जी आणि ई-सीमसोबत उपलब्ध आहे.

  • कार क्रॅश डिटेक्शन फीचर उपलब्ध मिळणार.


अॅपलने यात मोठा आणि फास्ट सेन्सर असल्याचा दावा केला आहे. या फोन बद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, फोनच्या लो-लाईट कॅप्चरमध्ये देखील 49 टक्के सुधारणा झाली आहे. यातील मागील कॅमेरा अल्ट्रा-वाइड आहे. फ्रंट-कॅमेरा 38 टक्के लो-लाईटमध्ये चांगलं काम करतो, असं कंपनीचं म्हणणं आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘इमर्जन्सी एसओएस व्हाया सॅटेलाईट’ हे फीचर नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणार. अमेरीका आणि कॅनडातून याची सुरुवात होणार आहे. तसेच ॲपल आयफोन 14 सप्टेंबर 16 पासून उपलब्ध होणार तर आयफोन 14 प्लस ऑक्टोबर 7 पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.


किंमत 


ॲपल 14 ची किंमत 799 डॉलर्स तर ॲपल 14 प्लसची किंमत 899 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे.