Apple Event Highlights : Apple ने  बहुप्रतिक्षित  Apple ने iPhone 14 लॉंच केला. बुधवारी Apple Far Out 2022 कार्यक्रमात अॅपलने आपली इतर प्रॉडक्ट नवीन फीचर्ससह लॉंच केली आहेत. यामध्ये iPhone 14 सह आणखी 3 नवीन iPhone बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. सर्वप्रथम Apple ने iPhone 14 बाजारात लाँच केला आहे. सोबतच कंपनीने iPhone चे 4 प्रकारही लॉंच केले आहेत. ते म्हणजे iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Plus असे आहेत. जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी 10 मुद्द्यांमध्ये.


Apple प्रॉडक्टबाबत महत्त्वाच्या गोष्टी 10 मुद्द्यांमध्ये


1-iPhone 14 सिरीजच्या iPhone 14 ची किंमत - $799 म्हणजेच 63,000 रुपये आहे.


2-iPhone 14 Plus फोनमध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. त्याचा कॅमेरा 48MP आहे. 


3-iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची स्टोरेज क्षमता 1 TB पर्यंत वाढवण्यात आली आहे.


4-Apple ने iPhone मध्ये प्रथमच 5-कोर GPU प्रोसेसर लाँच केला आहे.


5-iPhone 14 Max ची सुरुवातीची किंमत $1099  म्हणजेच  जवळपास 87000 रुपये इतकी आहे.


6-iPhone 14 Pro ची किंमत $999 म्हणजेच 79000 रुपये आहे 


7-iPhone 14 Plus ची किंमत $899 जवळपास 71000 रुपये इतकी आहे. 


8-Apple ने Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 देखील लॉन्च केले आहेत.


9-Apple ने iPhone चे मिनी मॉडेल म्हणजेच iPhone 14 Mini अद्याप सादर केलेले नाही.


10-Apple कंपनीच्या माहितीनुसार iPhone 14 मध्ये सिम कार्डसाठी स्लॉट दिलेला नाही. हे मॉडेल केवळ अमेरिकेसाठी आहे. 


Apple वॉच सिरीज बाबत जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
Apple ने Apple Watch Series 8 चे 2 व्हेरिएंट सादर केले आहेत. त्याच्या GPS व्हेरिएंटची किंमत $399 31,807 रुपये इतकी आहे. सेल्युलर व्हेरिएंटची किंमत $ 499 (सुमारे 39,779 रुपये) आहे. Apple Watch Series 8 काही नवीन फीचर्ससह लॉन्च करण्यात आले आहे. हे वॉच तुम्हाला हृदयाचे ठोक्यांबाबत, तसेच नाडीच्या ठोक्यांबाबत माहिती देते. हे घड्याळ वॉटर प्रूफ, डस्ट प्रूफ बनवण्यात आले आहे. 30 मीटर खोल पाण्यातही हे घड्याळ सहज काम करू शकते.


Apple AirPods 2 बाबत 
Apple ने Apple AirPods 2 लाँच केले आहे. जुन्या प्रॉडक्टच्या तुलनेत त्याच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Apple AirPods Pro देखील जुन्या AirPods मॉडेल प्रमाणेच आहे. Apple कंपनीने सेकंड जनरेशनचे AirPods लाँच केले. यावेळी कंपनीने AirPods Pro 2 तसेच iPhone 14 सिरीज आणि Apple Watch 8 सिरीज देखील लॉन्च केली आहे. 


संबंधित बातम्या


Apple iPhone 14 Launch: iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा


iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दंड