Apple AirPods Pro 2 : जगप्रसिद्ध Apple कंपनीने सेकंड जनरेशनचे AirPods लाँच केले. फार आऊट इव्हेंट  (Far Out Event) दरम्यान कंपनीने AirPods Pro 2 तसेच iPhone 14 सिरीज आणि Apple Watch 8 सिरीज देखील लॉन्च केली आहे. 


एअरपॉड 100% रिसायकल साहित्यापासून बनविलेले


Apple ने Apple H2 चिपसह नवीन बड लॉन्च केले आहेत. लॉन्च केलेल्या Apple AirPods मध्ये नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने AirPods मध्ये Adaptive Transparency Mode देखील दिला आहे, जो Noise Cancelation चा एक भाग आहे. याशिवाय एअरपॉड्समध्ये दोन टच कंट्रोल देखील देण्यात आले आहेत. बड्समधील आवाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन  लो-डिस्टॉर्शन ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. त्यावर काम करून बड्समधील नॉईज कॅन्सलेशनही चांगले केले आहे. यामध्ये अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) दुप्पट करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर स्पैटियल ऑडियोची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय यात बिल्ट-इन स्पीकर आहे. याची महत्वाची गोष्ट म्हणजे एअरपॉड 100% रिसायकल साहित्यापासून बनविलेले आहेत.


बॅटरी बॅकअप
एअरपॉड्सच्या बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने बॅटरी लाइफच्या बाबतीत 30 तासांच्या बॅकअपचा दावा केला आहे. तर याच्या बड्समध्ये फक्त 6 तासांचा बॅकअप उपलब्ध असेल. हे पॉड मॅगसेफद्वारे वायरलेस चार्ज देखील केले जाऊ शकते. ज्यांना ते विकत घ्यायचे आहे ते त्यांच्या आयफोनच्या मदतीने ते घेऊ शकतील.


किंमत किती?
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, यासाठी तुम्हाला 26 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहे. 9 सप्टेंबरपासून कंपनीच्या अधिकृत साइटवरून हे बड्स प्री-ऑर्डर करता येतील. त्यांची शिपिंग 23 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.


iPhone 14 भारतात लॉन्च


दरम्यान, ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या फोनची आतुरतेने वाट पाहत होते. तर कालच Apple ने बहुप्रतीक्षित असा iPhone 14 भारतात लॉन्च केला आहे. अॅपलचे इव्हेंट कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला आहे


संबंधित बातम्या


Apple iPhone 14 Launch: iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा


iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दंड