Airtel 5G Service: देशात टेलिकॉम क्षेत्रात संभाव्य मोठे बदल करणाऱ्या 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यानंतर अनेकांचे लक्ष 5 जी इंटरनेट सेवेवर लागले आहे. रिलायन्स जिओने दिवाळीत 5 जी सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता एअरटेलने देखील आपल्या 5 जी इंटरनेट सेवेबाबत मोठी माहिती दिली आहे. देशातील काही प्रमुख शहरांमध्ये एअरटेलची 5 जी सेवा पुढील महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व शहरी भागात 5 जी इंटरनेट सेवा पुरवणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या शहरात 5 जी लाँच होणार?
एका वृत्तानुसार, कंपनीचे सीईओ गोपाल वित्तल यांनी 5 जी बाबत माहिती दिली की, लवकरच एअरटेलची 5 जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आदी मोठ्या शहरांमध्ये डिसेंबर 2022 पर्यंत 5 जी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर 5 जी इंटरनेट सेवेचा विस्तार संपूर्ण देशभरात करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. डिसेंबर 2023 अखेरपर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे.
एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, एअरटेल 5 जीचा वेग अधिक असणार आहे. 4जी इंटरनेटच्या तुलनेत 5 जी चा वेग हा 20 ते 30 पटीने अधिक असणार आहे. त्यामुळे तुम्ही डिजीटल कामे तातडीने पूर्ण करू शकता. आवश्यकता असल्यास कोणतीही फाइल सहजपणे डाउनलोड करू शकता.
तुमच्या शहरात 5 जी कधी येणार?
Airtel Thanks App च्या माध्यमातून एअरटेलच्या ग्राहकांना आपल्या शहरातील 5 जी इंटरनेट लाँचिंगची स्थिती पाहता येणार आहे. त्याशिवाय, ज्यांच्याकडे 5 जी साठी पूरक असलेले एअरटेलचे सीम कार्ड आहे त्यांनी नवीन सीम कार्ड घेण्याची आवश्यकता नाही. ते 5 जी मोबाइलच्या माध्यमातून 5 जी सेवा घेऊ शकतील. 5 जी सेवा अॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनमधील नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन 4 जी किंवा LTE ऐवजी 5 जी नेटवर्कचा पर्याय निवडावा.
इतर महत्त्वाची बातमी :