Apple iPhone 15 : Apple iPhone 14 लाँच होऊन काही महिनेच झाले आहेत. आयफोन सीरिजचे चारही मॉडेल बाजारात चांगली विक्री करतायत. त्यामुळे ग्राहकांच्या iPhone 14 सीरिज खूप पसंतीस येत आहे. iPhone 14 नंतर आता बाजारात iPhone 15 ची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, साईटवर दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 15 ची डिझाईन पूर्णपणे वेगळी असेल. फोनच्या कोपऱ्यात कर्व्ड एज मिळेल. iPhone 15 मध्ये अजून काय नवीन बदल दिसतील ते पाहा. 


iPhone 15 मध्ये वेगवेगळे डिझाइन उपलब्ध असतील


आयफोनमधील नवीन डिझाईन पाहण्यासाठी चाहते अजूनही वाट पाहत आहेत. iPhone 12 पासून फोनची तीच डिझाईन दिसत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन iPhone 15 सीरीज वेगळ्या डिझाईनमध्ये येणार आहे. 


कर्व्ड एज iPhone 15 मध्ये उपलब्ध असेल


iPhone 15 ला स्लिम लूकच्या (Slim Look) जागी राऊंड बॉडी मिळणार आहे. आयफोनचे डिझाइन कसे असेल याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. मात्र, नवीन माहितीवरून डिझाईनमध्ये बरेच बदल दिसून येण्याची शक्यता आहे. PhoneArena ने फोनचे रेंडर दाखवले आहेत. फोनच्या पुढील स्क्रीनला सपाट कडा आणि मागच्या बाजूला कर्व्ड एज आहेत. म्हणजे फोन धरून ठेवणे सहज सोपे होणार आहे. iPhone 5c सारखे डिझाइन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 


असेही सांगितले जाते की, आगामी आयफोन्समध्ये टायटॅनियम बॉडी उपलब्ध असेल, ज्यामुळे डिव्हाइस हलके होईल. प्रो मॉडेल मानक मॉडेलच्या तुलनेत अॅल्युमिनियम बॉडी वापरू शकतात. डिझाईनशिवाय फिचर्समध्येही अनेक बदल पाहायला मिळतील. फोन 3nm प्रक्रियेचा वापर करून तयार केलेल्या नवीन चिपसेटद्वारे असणे अपेक्षित आहे आणि डिव्हाइसेसमध्ये लाइटनिंग पोर्ट ऐवजी USB-C पोर्ट असेल.


कंपनीने या वर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 14 सीरीजचे मॉडेल लॉन्च केले होते आणि आता पुढील फ्लॅगशिप सीरीजसाठी आणखी 10 महिने वाट पाहावी लागणार आहे. यावेळी कंपनीने स्टँडर्ड नॉचऐवजी डायनॅमिक आयलंडचा वापर केला आहे. डायनॅमिक आयलंड फीचर आगामी आयफोन 15 सीरीजमध्ये देखील पाहता येण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


iPhone 14 सीरीजचे हे फीचर Samsung Galaxy S23 सिरीजमध्ये मिळणार? जाणून घ्या सविस्तर