एक्स्प्लोर
कुरिअर कंपनीकडूनच अमेझॉनला तब्बल 3 लाखांचा गंडा
एकीकडे फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकाला कॅमेऱ्याऐवजी पाईपचे तुकडे पाठवण्याची घटना ताजी असताना दुसरीकडे पंढरपूरमध्ये ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनलाच तब्बल 3 लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
पंढरपूर : एकीकडे फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकाला कॅमेऱ्याऐवजी पाईपचे तुकडे पाठवण्याची घटना ताजी असताना दुसरीकडे पंढरपूरमध्ये ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनलाच तब्बल 3 लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
पंढरपूर तालुक्यातील काही लोकांनी अॅमेझॉनवरुन विविध कंपन्यांचे मोबाईल फोन खरेदी केले होते. यापैकी ३० लोकांनी मोबाईलमध्ये मागणीप्रमाणे पुरवठा न झाल्याने ते कुरिअर कंपनीला परत पाठविले.
यावेळी अॅमेझॉन कंपनीचा माल ग्राहकांपर्यंत पोहचवणाऱ्या एका स्थानिक कुरिअर कंपनीने ते सर्व पार्सल कंपनीला परत न पाठवता त्यातील मोबाईल काढून घेतले आणि त्या पार्सलमध्ये खराब साहित्य भरुन अॅमेझॉनला परत पाठवले. तब्बल 3 लाख किंमतीचे हे सर्व मोबाईल या कुरिअर कंपनीने इतर लोकांना विकले.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्सलमध्ये खराब साहित्य आल्याचं पाहून अॅमेझॉनला यात काहीतरी काळंबेरं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तात्काळ अॅमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकाने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत अॅमेझॉन कंपनीचे पार्सल ग्राहकांपर्यंत पोहचवणाऱ्या कुरिअर कंपनीचा मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी या कर्मचाऱ्यांनी पार्सलमधील मोबाईल विकून त्यातून एक टेम्पो खरेदी केल्याचं कबूल केलं. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं. या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
संबंधित बातम्या :
फ्लिपकार्टवर 48 हजारांचा कॅमेरा मागवला, हाती पाईपचे तुकडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement