Adidas RPT-02 SOL Headphone : आजकाल हेडफोन्स वापरणं एक प्रकारची फॅशन झाली आहे. उत्तम साऊंड क्वालिटी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे हेडफोन्स प्रत्येकालाच आवडतात. मात्र, हे हेडफोन्स वारंवार चार्ज करावे लागतात. या समस्येचा तुम्हीही सामना करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, Adidas ने सौर उर्जेसह Adidas RPT-02 SOL वायरलेस हेडफोन लॉन्च केले आहेत. Adidas RPT-02 SOL ला सौर आणि वीज दोन्हीने चार्ज करता येऊ शकते. यामध्ये कॉल रिजेक्ट करण्याची आणि आवाज अॅडजस्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. Adidas RPT-02 SOL ला 45mm डायनॅमिक ड्रायव्हर मिळतो. याशिवाय, Adidas RPT-02 SOL मध्ये पाणी प्रतिरोधक IPX4 सुविधा देखील आहे. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या हेडफोनची बॅटरी 80 तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा दावा Adidas ने केला आहे.


Adidas RPT-02 SOL चे स्पेसिफिकेशन्स : 



  • Adidas RPT-02 SOL हा 45mm डायनॅमिक ड्रायव्हरसह फ्लॅगशिप हेडफोन आहे.

  • Adidas RPT-02 SOL ची वारंवारता श्रेणी 20-20,000Hz आणि 105dB चे संवेदनशीलता रेटिंग आहे.

  • Adidas RPT-02 SOL मध्ये मायक्रोफोन आहे आणि त्याला कंट्रोल नॉब देखील मिळतात.

  • Adidas RPT-02 SOL हेडफोनसह लाईट इंडिकेटर देखील प्रदान केला आहे.

  • सोलर पॅनेल Adidas RPT-02 SOL च्या शीर्षस्थानी आढळते, ज्यावरून हा हेडफोन चार्ज केला जातो. या सोलर पॅनलला पॉवरफॉयल सोलर चार्जिंग पॅनल म्हणतात, हे स्वीडिश कंपनी Exeger ने बनवले आहे. हे पॅनल नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश दोन्ही कॅप्चर करू शकते.

  • Adidas RPT-02 SOL हेडफोन्सचे कुशन आणि इअरकप देखील वॉशेबल आहेत.

  • Adidas RPT-02 SOL ला पाणी प्रतिरोधक म्हणून IPX4 रेट केले आहे.

  • Adidas RPT-02 SOL मध्ये ब्लूटूथ v5.2 देण्यात आला आहे. हे Android आणि iOS दोन्ही उपकरणांशी कनेक्ट केले जाऊ शकते.

  • Adidas RPT-02 SOL च्या बॅटरीचा 80 तासांचा बॅकअप असल्याचा दावा केला जातो. चार्जिंगसाठी यात टाइप-सी पोर्ट आहे.

  • Adidas RPT-02 SOL चे वजन 256 ग्रॅम आहे.


Adidas RPT-02 SOL ची किंमत :


Adidas RPT-02 SOL ची किंमत $229 (सुमारे 18,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा हेडफोन सध्या कंपनीच्या फक्त अमेरिकन वेबसाईटवर उपलब्ध आहे. Adidas RPT-02 SOL नाईट ग्रे आणि सोलर यलो कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. Adidas RPT-02 SOL 23 ऑगस्टपासून विक्रीसाठी जाईल.


महत्वाच्या बातम्या :