Dangerous 420-Foot Wide Asteroid : लघुग्रहांच्या आक्रमणातून पृथ्वी पुन्हा एकदा आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. मागील गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक लघुग्रहांचे आक्रमण असूनही पृथ्वी त्यातील प्रत्येकापासून बचावली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार 420 फूट रुंद सिटी किलर लघुग्रह पृथ्वीवर  ग्रहावर आदळला असता, तर आपल्यासाठी मोठी आपत्ती घडू शकली असती. सिटी किलर लघुग्रह दुर्दैवाने पृथ्वीच्या कक्षेत येऊन धडकला असता, तर शॉकवेव्ह, भूकंप आणि त्सुनामीचे संकट येऊ शकले असते. मात्र, हे संकट टळले असले, तरी पण त्याचा आनंद साजरा करण्यास थोडी घाई होऊ शकते. आता त्यामागील कोणती कारणे आहेत हे आता जाणून घेऊया. 


नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने या महाकाय लघुग्रहाविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार, हा लघुग्रह 2019 मध्ये पहिल्यांदा दिसला होता आणि त्याला 2019 AV13 असे नाव देण्यात आले होते. तो लघूग्रह 420 फूट किंवा 128 मीटर आहे. तो पृथ्वीच्या 5.2 दशलक्ष किमीटर इतका जवळ आला होता, पण सुदैवाने, तो पृथ्वीच्या दिशेने न येता सुरक्षित मार्गाने गेल्याने संकट टळले होते.  तथापि, तोच धोकादायक लघुग्रह आता मंगळाच्या दिशेने सरकत आहे आणि त्याची कक्षा ओलांडून त्याच्या ऍफेलियन (सूर्यापासून सर्वात दूर बिंदू) गाठेल.


420 फूट रुंद लघुग्रह पृथ्वीवर धडकला नसला, तरी त्याच्या आकारमानामुळे आणि पृथ्वीशी जवळीक असल्यामुळे या लघुग्रहाला पृथ्वीच्या जवळची वस्तू किंवा NEO असे संबोधण्यात आले. याचाच अर्थ असा की, हा लघुग्रह भविष्यात पृथ्वीवर धडकण्याची खरी (अत्यंत कमी) शक्यता आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता, तर मोठी आपत्ती ओढवली असती. आणि म्हणूनच नासाचे प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस (पीडीसीओ) सतत अंतराळ खडकावर लक्ष ठेवत आहे. आणि आता तो लघूग्रह पृथ्वीच्या शेजारून गेल्याने आपण सुटकेचा नि:श्वास सोडू शकतो यात शंका नाही. 


याच महिन्यात आणखी तीन संकट 


आणखी एक लघुग्रहाचा भडिमार अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 22 ऑगस्ट रोजी तीन लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या त्रिकुटामध्ये 2015 QH3 नावाचा 44 फूट रुंद लघूग्रह, 2022 QM नावाचा 61 फूट रुंद लघुग्रह आणि त्यापैकी सर्वात मोठा, 92 फूट रुंद लघुग्रह QW3 आहे. त्यापैकी कोणी पृथ्वीला धोका निर्माण करू शकतो का? हे येणारा काळच सांगेल.