Google Play Store : गूगलच्या गूगल प्ले स्टोअरला (Google Play Store) दहा वर्ष पूर्ण झाली आहे. गूगलनं ही इकोसिस्टम पहिल्यांदा 2012 मध्ये लॉन्च केली होती. तेव्हापासून, गूगल प्ले स्टोअरनं असा ठसा उमटवला आहे की, आता 190 देशांमधील 2.5 अब्ज लोक दर महिन्याला Google Play Store चे अॅप्स, गेम आणि डिजिटल कंटेंटचा वापर करत असतात. याच निमित्तानं Google नं सांगितलं की, "कंपनी भारतात गुंतवणूक करणं सुरूच ठेवणार आहे, जेणेकरून आम्ही Google Play Store वर चांगले आणि महत्त्वाचे अॅप्स येणं सुरु राहील." 


भारतात गूगल प्ले स्टोअरचा 10 वर्षांचा प्रवास 



  • 2012 : 2012 मध्ये गूगल प्ले स्टोअरनं गूगल प्ले स्टोअर ग्लोबली लॉन्च केला होता. 

  • 2017 : त्यानंतर 2017 मध्ये गूगलनं युजर्सच्या सुरक्षेसाठी गूगल प्ले प्रोटेक्ट लॉन्च केलं होतं. 

  • 2018 : 2018 मध्ये ई-लर्निंग प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी गूगलनं Google Play Academy लॉन्च केली. याच वर्षी गूगलनं गेमिंग स्टार्टअपला सपोर्ट करण्यासाठी indie Games Accelerator लॉन्च केलं होतं. 

  • 2019 : 2019 मध्ये ऑनलाईन पेमेंट UPI गूगल प्ले स्टोअरमध्ये सहभागी केलं होतं. 

  • 2020 : 2020 मध्ये, Google Play Console विकसकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सादर करण्यात आला. 

  • 2021 : 2021-22 मध्ये, Google ने Appscale Academy सादर केली. 

  • 2022 : वर्ष 2022 मध्ये, Google ने भारतात Play Pass आणि ऑफर लाँच केली आहे. त्याच वर्षी, Google ने युजर्सची सुरक्षा आणि अॅपचं डाटा कंज्युम जाणून घेण्यासाठी Data Safety Section देखील सुरू केला आहे.


प्ले स्टोअरच्या वापरात भारत सर्वात पुढे 


Google India Play Partnership चे संचालक आदित्य स्वामी म्हणाले, "आमच्यासोबत काम करून सुमारे 20 लाख लोकांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आम्हाला प्रत्येक डेव्हलपरची कल्पना जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. Google Play Store वरील अॅप डाउनलोड आणि वापराच्या बाबतीतही भारत जगात आघाडीवर आहे. आम्ही पाहत आहोत की, आमच्या प्लॅटफॉर्मवरून दररोज अनेक लोकांना नोकऱ्या आणि जागतिक संधी मिळत आहेत."