Reliance AGM 2022 Highlights: रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत गुंतवणूकदारांसमोर बोलताना मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या कामगिरीचा आढावा मांडताना भविष्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा केल्यात. रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यासह ग्रीन एनर्जी आणि इतर क्षेत्रात रिलायन्स कोणती पावले उचलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. 


मुकेश अंबानी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे: 


> जिओ 5 जी जगातील अद्यावत इंटरनेट सेवा असणार


> दिवाळीत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईत 5G सेवा सुरू करणार 


> डिसेंबर 2023 पर्यंत रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा देशातील प्रत्येक शहरात, गावात पोहचवणार


> रिलायन्स जिओ 5 जी नेटवर्ककरीता दोन लाख कोटींची गुंतवणूक


> जिओकडून एअरफायबरची घोषणा करण्यात आली आहे. जिओ एअरफायबरमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा स्पीड अधिक असणार.


> रिलायन्स जिओ स्टॅण्डअलोन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.


 > मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी 


> रिलायन्सकडून देशातील स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करण्यात येणार


> सोलर, बॅटरी आणि इलेक्ट्रोलायझरवर रिलायन्सचा भर, बायोएनर्जी आणि न्यू एनर्जीवर रिलायन्स भर देणार 


> ऑइल टू केमिकल आॅपरेशनसाठी पुढील 5 वर्षात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार


>रिलायन्स एफएमसीजी व्यवसायात उतरणार


> ऑनलाइन फार्मसी 'नेटमेड'  रिलायन्सकडून टेकओव्हर


> 20GW सोलर ऊर्जा निर्मितीसाठी गुंतवणूक करणार


> 2023 पर्यंत रिलायन्स बॅटरी उत्पादन निर्मिती क्षेत्रातही उतरणार, जामनगर येथे पावर इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर सिस्टिमसाठी कारखाना उभारणार


> अंबानी यांच्या तिसऱ्या पिढीकडे रिलायन्सची धुरा? आकाश अंबानी यांच्याकडे जिओ, ईशा अंबानी यांच्याकडे रिटेल आणि अनंत अंबानी यांच्याकडे ग्रीन एनर्जी उद्योगाची धुरा सोपवण्याचा निर्णय मुकेश अंबानी यांनी जाहीर केला. 


रिलायन्स ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अंबानी यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जाहीर केले होते. कंपनीने मागील वर्षी सोलर मॉड्युल्स, हायड्रोजन इलेक्ट्रोलायजर्स, फ्यूल सेल्स आणि स्टोरेज बॅटरी तयार करण्यासाठी 4 गीगा-फॅक्टरीज तयार करण्याची घोषणा केली होती. रिलायन्सने जागतिक पातळीवर ग्रीन एनर्जीशी संबंधित काही लहान कंपन्यांना अधिग्रहित केले आहे.