Reliance Jio 5G Mobile: रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. त्याशिवाय, रिलायन्सकडून देशातील स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. या स्वस्त दरातील स्मार्टफोनसाठी रिलायन्सने जगातील दिग्गज आयटी कंपन्यांसोबत भागिदारी केली आहे.


मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी केली असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. 


रिलायन्स सगळ्यात स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करणार असल्याची चर्चा होती. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे म्हटले जात आहे. या स्वस्तातील मोबाईलची वैशिष्ट्ये कसे असतील याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. 


प्रोसेसर काय?


एका वृत्तानुसार, रिलायन्स जिओ 5G स्मार्टफोनमध्ये  Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.  यामध्ये 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी असू  शकते. मात्र, रिलायन्सकडून 2 जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटचा मोबाइल लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


कॅमेरा कसा असणार?


जिओ 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा HD+IPS LCD स्क्रीन दिली जाऊ शकते. या फोनमध्ये रिअर ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो.  प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असू शकतो. त्याशिवाय 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर असू शकतो. 


रिलायन्स जिओ 5G स्मार्टफोन हा दिवाळी लाँच होण्याची शक्यता आहे. या मोबाईल फोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून मोबाईलच्या सुट्ट्या भागांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईला कंपनी कसा प्रतिसाद देते, याकडेही जाणकरांचे लक्ष लागले आहे. 


सगळ्यात स्वस्त डेटा


मुकेश अंबानी यांनी सांगितले की रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरात सेवा देणार आहे. देशातील सगळ्यात स्वस्त 5G इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स जिओसोबत 100 मिलियन घरांना जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.


दिवाळीत 5G धमाका


रिलायन्स जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरात दिवाळीपर्यंत सुरू करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी इंटरनेट सेवा देणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले. रिलायन्स आपल्या जिओ 5 जी सेवेसाठी अद्यावत तंत्रज्ञान वापर असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओ 5 जी नेटवर्ककरीता दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे