नवी दिल्ली : शाओमीने 100 वॅटचा सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीची घोषणा केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या टेक्नोलॉजीमुळे 4000 mAh ची बॅटरी अवघ्या 17 मिनिटात फूल चार्ज होणार आहे. या चार्जिंगच्या प्रत्याक्षिकाचा एक व्हिडीओ शाओमी कंपनीचे सीईओ लिन बिन यांनी शेअर केला आहे.


शाओमी कंपनीने ही चार्जिंग टेक्नोलॉजी वीवोच्या वीओओसी चार्चिंगला पर्याय म्हणून तयार केली आहे. या टेक्नोलॉजीचे प्रोडक्ट वेगाने तयार केले जात आहेत आणि याचा वापर प्रथम रेडमीच्या मोबाईलमध्ये केला जाणार असल्याची माहिती रेडमीचे प्रमुख लु विबिंग यांनी दिली.



शाओमीने 100 वॅटच्या सुपर चार्ज टर्बो टेक्नोलॉजीची घोषणा वीबोवर केली. मात्र या टेक्नोलॉबद्दलची अधिक माहिती कंपनीने शेअर केलेली नाही. लिन बिन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी दिसत आहे. शाओमीच्या सुपरचार्ज टर्बो टेक्नोलॉजीच्या मदतीने 4000 mAh ची बॅटरी अवघ्या 17 मिनिटात चार्ज होणार आहे. तर ओप्पो वीओओसी फ्लॅश या टेक्नोलॉजीच्या मदतीने 3700 mAh ची बातमी एवढ्या वेळात 65 टक्के चार्ज होऊ शकते.


मात्र ही टेक्नोलॉजी बाजारात कधीपर्यंत येणार किंवा रेडमी मोबाईलमध्ये दिसेल, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे रेडमी मोबाईल लवकरच या टेक्नोलॉजीसोबत दिसू शकणार आहे. विबिंग यांनी फोनचं नाव आणि लॉन्चिंग कधी होणार याची माहितीही दिलेली नाही.