Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला गेलाय, तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (Sahyadri Tiger Reserve) प्रजननक्षम मादा नसल्याने वाघांची संख्या वाढण्यास अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur News) नुकत्याच प्रजननक्षम झालेल्या 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या स्थलांतराला स्थानिक गाईड आणि जिप्सी चालक यांनी कडाडून विरोध केलाय. त्यामुळे आता सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्वसन रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Continues below advertisement


Chandrapur News : प्रजननक्षम झालेल्या या वाघिणींना स्थलांतराचा निर्णय, स्थानिकांचा विरोध


चंदा आणि चांदणी म्हणजे झरणी आणि छोटा मटका या प्रसिद्ध टायगर कपलचे बछडे आहते. छोटा मटका या आपल्या वडिलांप्रमाणेच अतिशय बोल्ड आणि कोणालाही न घाबरणाऱ्या त्याच्या स्वभावामुळे पर्यटकांमध्ये सध्या या वाघाणींची मोठी क्रेझ आहे. मात्र नुकत्याच प्रजननक्षम झालेल्या या वाघिणींना ताडोबा प्रशासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतलाय. वाघांची संख्या वाढल्याने चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेला मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या निर्णयाला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय.


ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अलिझंजा, नवेगाव आणि निमढेला परिसरात या वाघिणीचं वास्तव्य आहे. चंदा आणि चांदणी यांचा जन्म याच भागात झालाय आणि त्यामुळे स्थानिकांना या वाघिणींबद्दल आपुलकी असणं साहजिक आहे. त्यातच आता या वाघिणी गर्भवती असल्याची शंका असल्याने स्थानिकांनी या वाघिणींच्या शिफ्टिंगला तीव्र विरोध केलाय. स्थानिकांच्या या विरोधाची नेमकी कारणं काय आहेत हे आपण एकदा पाहूया.


स्थानिकांच्या विरोधाची नेमकी कारणं काय?


- चंदा आणि चांदणीचा जन्म याच भागात झालाय आणि त्या इथे स्थिरावलेल्या आहेत


-या वाघिणींनी आजपर्यंत कुठल्याही माणसावर किंवा गुराढोरांवर हल्ला केलेला नाही. म्हणजेच या वाघिणींमुळे इथे मानव-वन्यजीव संघर्ष नाही.


-या वाघिणींमुळे स्थानिक गाईड आणि जिप्सी चालकांना आणि इतर व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालाय.


- या भागात असलेल्या 104 गाईड आणि जिप्सी चालकांचा म्हणजेच पर्यायाने त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या दोन वाघिणींच्या भरोशावर आहे.


-या दोन वाघिणी सध्या गर्भवती आहे, अशा अवस्थेत जर त्यांना स्थलांतरित करण्यात आलं तर त्यांना आणि त्यांच्या होणाऱ्या बछड्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो


-विशेष म्हणजे स्थानिकांच्या या मागणीला ताडोबात येणाऱ्या पर्यटकांचा देखील पाठिंबा आहे.


आणखी वाचा