Suriya Buys Flat In Mumbai : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सूर्याची (Suriya) गणना होते. सूर्याचा 2021 साली आलेला 'जय भीम' (Jai Bhim) हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील सूर्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून सूर्या मुंबईत घर घेण्याचा विचार करत होता. आता त्याने नव्या आलिशान फ्लॅटसाठी 70 कोटी मोजले आहेत. सूर्याने घर घेतलेल्या इमारतीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणी मंडळींनीदेखील घर घेतलं आहे. आता दोन कोटी रुपयांत सूर्याने या घराचं बुकिंग केलं आहे. 


मनोरंजनसृष्टीत काम करण्यासाठी मुंबई हे योग्य शहर आहे. मुंबईत अनेक संधी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच सूर्या पत्नी ज्योतिका आणि मुलांसह मुंबईत स्थलांतरित होण्याचा विचार करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनीदेखील मुंबईत एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. सूर्या मुंबईत आल्यानंतर अनेक बॉलिवूड सिनेमांतदेखील काम करू शकतो.


सूर्याचे आगामी प्रोजेक्ट (Suriya Upcoming Project)


सूर्याच्या 'जय भीम' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक पुरस्कार सोहळ्यांत या सिनेमाने बाजी मारली. पण ऑस्करच्या शर्यतीतून हा सिनेमा बाहेर पडला. त्यानंतर सूर्याचा 'नाम्बी नारायण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आर माधवनच्या या सिनेमातील सूर्याने आपल्या भूमिकेची छाप सोडली. आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'सूरराई पोत्रू' या सिनेमात सूर्याची झलक पाहायला मिळणार आहे. तसेच त्याचा 'सुरिया 42' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.






सूर्याच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या... (Suriya Net Worth)


सूर्या एका सिनेमासाठी तब्बल 20 ते 25 कोटी मानधन घेतो. तर एक जाहिरातीसाठी तो दोन कोटी रुपये आकारतो. आजवर त्याने 52 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सध्या तो त्याची पत्नी आणि मुलांसह चैन्नईतील त्याच्या आलिशान घरात राहत आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तो महिन्याला 1.5 कोटी कमवत असून त्याची एकूण संपत्ती 185 कोटी आहे. 


संबंधित बातम्या


Suriya 42 Mostion Poster : सूर्याच्या आगामी सिनेमाची घोषणा; पोस्टर शेअर करत म्हणाला...