Chhatrapati Sambhaji Nagar News: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. संपाला आठवडा उलटत आला तरीही याबाबत तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी सातव्या दिवशीही संपावर कायम आहे. दरम्यान या संपामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) अनेक शाळा (School) बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील गावकरी पुढे आले आहेत. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावकऱ्यांनीच शाळा भरवली आहे. 


जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. तर आज संपाचा सातवा दिवस आहे. मात्र या संपावर अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान याच संपात शिक्षक देखील सहभागी असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शाळा बंद आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. तर शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील गावकरी पुढे आले आहेत.  शिक्षकांनी मुलांना शिकवणं बंद केल्याने गावकऱ्यांनीच आता शाळा भरवायला सुरवात केली आहे. 


मुलांना शिकवण्यासाठी गावातील उच्चशिक्षित तरुण पुढे आले


शिक्षक संपावर असल्याने भग्गाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सद्या बंद आहेत. शिक्षक शाळेत आल्यावर संपामुळे वर्ग भरवत नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भग्गाव येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन, स्वतः शाळा भरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षक संपावर असताना शाळा सुरु करण्यात आली आहे. तर मुलांना शिकवण्यासाठी गावातील उच्चशिक्षित तरुण पुढे आले आहेत. या उच्चशिक्षित तरुणांनी शाळेत येऊन वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. त्यात परीक्षा तोंडावर असल्याने शाळा बंद असल्यास याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांचे संप संपेपर्यंत गावकरी शाळा भरवणार आहे. 


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन...


जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान यावेळी संपावर गेलेल्या कर्मचारी यांनी आपल्याला कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन केले आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महसूल विभागातील संपकरी कर्मचारी यांनी देखील थाळी वाजवत आपला रोष व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर आंदोलन सुरु असताना कार्यालयात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या गाडीला देखील संपकऱ्यांनी घेराव घातला. तसेच त्यांच्यासमोर थाळी वाजवत आपल रोष व्यक्त केला. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: संपकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव; थाळी वाजवून व्यक्त केला रोष


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI