Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता असल्याचं दिसून आलं. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 361 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 111 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.62 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,628 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.65 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,988 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज मोठी घसरण झाली. कमकुवत जागतिक संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे.  


शेअर बाजाराची सुरुवात आज मोठ्या पडझडीने झाली. सेन्सेक्समध्ये दुपारपर्यंत जवळपास 800 अंकांची घसरण झाली होती. नंतर बाजार काहीसा सावरला आणि तो अंकांच्या घसरणीने बंद झाला. 


आज बाजार बंद होताना Bajaj Finserv, Adani Enterprises, Bajaj Finance, Hindalco Industries आणि  Wipro च्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. तर HUL, BPCL, ITC, Grasim Industries आणि Nestle India च्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


एफएमसीजी क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. आयटी, मेटल आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. 


बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची घसरण झाली आहे. 


Share Market Closing Bell: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने


आजच्या ओपनिंग सत्रामध्ये सेन्सेक्स 216.38 अंकांच्या म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 57,773 वर व्यवहार करत होता. NSE चा निफ्टी 33.45 अंकांच्या म्हणजेच 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 17066 च्या पातळीवर उघडला.


Share Market Closing Bell:  सोन्याची किंमत आजही वाढ


मागील आठवड्यात सोन्याच्या दरात पाच टक्क्याहून अधिक वाढ झाल्यानंतर, सोमवारी सोन्याच्या किमती पुन्हा 1.5 टक्क्यांची वाढ झाली. 


शनिवार व रविवार दरम्यान, स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी UBS Group AG द्वारे क्रेडिट सुईस ग्रुप AG च्या टेकओव्हरसाठी मध्यस्थी केली, तर फेडरल रिझर्व्ह आणि इतर पाच केंद्रीय बँकांनी यूएस डॉलर स्वॅप व्यवस्थेमध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं. 


या शेअर्समध्ये वाढ झाली



  • HUL- 2.61 टक्के

  • BPCL- 2.35 टक्के

  • ITC- 0.87 टक्के

  • Grasim- 0.48 टक्के

  • Nestle- 0.42 टक्के


या शेअर्समध्ये घसरण झाली



  • Bajaj Finserv- 4.33 टक्के

  • Adani Enterpris- 3.82 टक्के

  • Bajaj Finance- 3.17 टक्के

  • Hindalco- 2.76 टक्के

  • Wipro- 2.48 टक्के


ही बातमी वाचा: