Ashti News : आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थानाच्या जमिनीबाबत मी तक्रारी केल्या होत्या. त्या चौकश्या पूर्ण होईपर्यंत औरंगाबाद खंडपीठाने मला पोलीस संरक्षण दिले होते. मात्र अचानक 11 तारखेला पोलीस अधीक्षकांनी दिलेले संरक्षण काढून घेतले आहे.  मी न्यायालयात कोणत्याही भ्रष्टाचाराबाबत पाठपुरावा तक्रार करू नये यासाठी यापूर्वी माझ्यावर हल्ले झालेत. हे सर्व हल्ले आणि गुन्हे दाखल करण्याचे पाप सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता हे दोघे मिळून करत असतात. आमदार सुरेश धस यांच्या विरोधात देवस्थान जमीन घोटाळा, वक्फ बोर्ड जमीन असे गुन्हे दाखल आहेत. देशमुख हत्या प्रकरणात धस पुढे येऊन असे म्हणतात मला देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली, त्यात माझा काही संबंध नाही.  मात्र न्यायालयाचा अवमान आरोपी मीडिया पुढे करत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा पाप सुरेश धस करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. 
  


माझे पोलीस संरक्षण काढल्याने माझा जीविताला धोका निर्माण झाला आहे. याला केवळ सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता जबाबदार आहेत. अनेक देवस्थान प्रकरण न्यायालयात निकाली लागत असताना माझे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आणि पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, जेणेकरून मी न्यायालयात गेलो नाही पाहिजे. असे पाप सुरेश धस करत आहेत. मी सुरेश धस यांना आव्हान देत नाही तर मी वस्तुस्थिती मांडत आहे. असेही सामाजिक कार्यकर्ते राम खाडे म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर लोकांना भावनिक करायचं आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्याचे काम सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस करत आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे


जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत. मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला आहे. अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, याचा आम्ही निषेध करतो. धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे तिथे पालकमंत्री झाले. म्हणून आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने याला विरोध आहे. अजित पवार यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्राला पालकमंत्री पद द्यायला हवं होतं. यासाठी आम्ही अजित दादांना आज काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलन अरविंद देशमुख यांनी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या