मुंबई : पोस्ट ऑफिसकडून गुंतवणुकीसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकी तीन योजना छोट्या गुंतवणूकदारांसाठी किंवा सामान्य व्यक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत. या योजना अडचणीच्या काळात सामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर ठरु शकतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या विषयी माहिती असणं महत्त्वाचं आहे. 


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही टर्म इन्श्यूरन्स योजना आहे. यातून पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.   18 ते 50 वर्षे वयोगटातील सहभागी बँक आणि पोस्ट ऑफिसमधील सर्व वैयक्तिक खातेदारांना सहभागी होण्याचा अधिकार आहे. एका किंवा वेगवेगळ्या बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीची एकाधिक बँक आणि पोस्ट ऑफिस खाती असल्यास, ती व्यक्ती केवळ एका बँक आणि पोस्ट ऑफिस खात्याद्वारे योजनेत सामील होण्यास पात्र आहे.  


18 ते 50 वर्षे वयोगटातील सहभागी बँक आणि पोस्ट ऑफिसमधील सर्व वैयक्तिक खातेदारांना सामील होण्याचा अधिकार आहे. एका किंवा वेगवेगळ्या बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीची एकाधिक बँक आणि पोस्ट ऑफिस खाती असल्यास, ती व्यक्ती केवळ एका बँक आणि पोस्ट ऑफिस खात्याद्वारे योजनेत सामील होण्यास पात्र आहे. याचा वार्षिक प्रिमियम 436 रुपये इतका आहे. म्हणजे एका महिन्यात फक्त 36 रुपये इतका खर्च येतो.   


प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना


प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आर्थिकृष्ट्या कमजोर आणि जे विमा कंपन्यांच्या विमा योजनांचे प्रिमियम देऊ शकत नाहीत यांच्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही योजना 2015 ला सुरु करण्यात आली होती. ही योजना बँक आणि पोस्टातर्फे राबवली जाते. 18 ते 70 वयोगटातील सर्व बँक आणि पोस्ट ऑफिस खातेधारक या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील. एखाद्या व्यक्तीची अनेक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाती असतील, तर ती व्यक्ती केवळ एकाच बँक आणि पोस्ट ऑफिसच्या खात्याद्वारे या योजनेत सहभागी होऊ शकते. बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यासाठी आधार कार्ड हे प्रमुख के. वाय.सी. कागदपत्र असेल. 


प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत विमा संरक्षण 1 जून ते 31 मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल, त्यासाठी दरवर्षी 31 मे पूर्वी योजनेत सहभागी होणे आवश्यक असते. दरवर्षी खात्यातून रक्कम वजा होण्यासाठी विहित नमुन्यातील फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्यानंतरच पूर्ण वर्षाचा विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी होणे शक्य होईल.  या योजनेत सहभागी होण्यासाठी 20 रुपये भरावे लागतील. 


अटल पेन्शन योजना 


अटल पेन्शन योजनेत निवृत्तीच्या पेन्शनसाठी अगोदरपासूनचं गुंतवणूक करता येते. भारत सरकारच्या या योजनेत दरमहा 5000 रुपयांची पेन्शन निवृत्तीनंतर मिळेल. हे गुंतवणुकीवर अवलंबून असतं. जो नागरिक कर भरत नाही, ज्याचं वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असेल ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. 


इतर बातम्या :


Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ?