एक्स्प्लोर

शेतकरी कर्जमाफीची जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्धच नाही

राज्य सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची जिल्हानिहाय माहितीच शासनाकडे उपलब्ध नाही, असं माहिती अधिकारात उघड झालं आहे.

मुंबई : राज्य सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची जिल्हानिहाय माहितीच शासनाकडे उपलब्ध नाही, असं माहिती अधिकारात उघड झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत 14,388 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप केलं आहे. यात 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा दावाही सरकारने केला. मात्र माहिती अधिकारात जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शेतकरी कर्जवाटपाबाबत पारदर्शी असलेल्या सरकारच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे माफ केलेल्या कर्जाची माहिती मागितली होती. एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण वाटप निधी याची जिल्हानिहाय माहिती गलगली यांनी मागितली होती. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी अनिल गलगली यांना कळवलं की एकूण बँकेत जमा केलेल्या निधीची रक्कम याबाबत जिल्हा निहाय माहिती शासन स्तरावर उपलब्ध नाही, तसंच विदर्भातील गावनिहाय माहितीही शासनाकडे उपलब्ध नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जांची स्थिती सरकारने दिलेल्या माहितीनुसार 36 जिल्हे आणि इतर असे शेतकरी कर्जमाफीसाठी एकूण 37 जिल्ह्यात 56 लाख 59 हजार 159 अर्ज आले होते. यात सर्वाधिक अर्ज अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांची  संख्या 3 लाख 34 हजार 920 आहे, तर 1620 अर्ज मुंबई उपनगर आणि 23715 मुंबई शहरातील अर्ज शासनाला मिळाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकरी कर्जमाफीची स्थिती राष्ट्रीयीकृत बँकेतील 19 लाख 88 हजार 234 खाती मंजूर झाले असून 7766 कोटी 55 लाख इतकी रक्कम बँकांना शासनाने दिली आहे. बँकांनी त्यातली 7589 कोटी 98 लाख  इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. जिल्हा सहकारी बँकांमधील शेतकरी कर्जमाफीची स्थिती जिल्हा सहकारी  बँकेतील 26 लाख 64 हजार 576 खातीही मंजूर झाली आहेत. यात 6770 कोटी 18 लाख इतकी रक्कम जिल्हा सहकारी बँकांना दिली असून बँकांनी त्यातील 6797 कोटी 74 लाख इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. शेतकरी कर्जमाफीची एकंदर स्थिती 33 राष्ट्रीयकृत आणि 30 जिल्हा सहकारी बँकेत 46,52,810 खाती मंजूर असून 24 हजार 536 कोटी 74 लाख इतकी रक्कम शासनाने बँकांना दिली आहे. बँकांनी त्यातील 14 हजार 387 कोटी 72 लाख इतकी रक्कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. शासनाने प्रचंड निधी वाटप केला असला तरीही जिल्हानिहाय आणि गावनिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसणे ही यंत्रणेतील चूक आहे. त्यामुळे खरे लाभार्थी कोण असा सवालच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Horoscope Today 27 July 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ठाण्यात शिंदे -आव्हाड एकत्र! आम्ही सुद्धा तुमचेच, लोकांच्या हितासाठी हातात हात घालून काम करु, आव्हाडांचं सूचक वक्तव्य 
ठाण्यात शिंदे -आव्हाड एकत्र! आम्ही सुद्धा तुमचेच, लोकांच्या हितासाठी हातात हात घालून काम करु, आव्हाडांचं सूचक वक्तव्य 
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget