एक्स्प्लोर

Vidarbha Schools : सुरु झाल्या ऑफलाईन शाळा; फळ्यावर चालला खडू अन् बाकांवर गर्दी

दोन वर्षानंतर शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ, काही चिमुकल्याच्या शाळेचा पहिलाच दिवस, तर काहींना सुट्टी संपल्याची हुरहूर, अशा वेगवेगळ्या भावनेतून आलेल्या विद्यार्थ्यांचे शाळांनी स्वागत केले.

नागपूरः  कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात 'ऑनलाईन स्कूल' हा शब्द प्रचलीत झाला होता. शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी अशा पद्धतीने शाळा सुरू होती. मात्र प्रदीर्ष काळानंतर विद्यार्थ्यांनी वर्ग खचाखच भरलेले दिसले. उन्हाळी सुट्ट्यांनंतर आज शहरातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. आज सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. मनपा आयुक्त  राधाकृष्णन बी यांनी रामनगर दक्षिण भारतीय मंदिर जवळ मनपा इंग्रजी शाळेत नवीन शैक्षणिक सत्राचे उदघाटन केले. यापूर्वी 27 जूनला शाळा सुरु करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. मात्र नंतर नवीन आदेशानुसार 29 जून रोजी शाळा सुरु करण्याजे आदेश जारी करण्यात आले होते.

तसेच नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दोन वर्षांनंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा आज वाजली. जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 5.15पर्यंत अनुदानित व काही खासगी शाळांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 1536 शाळांनी प्रवेशोत्सवाची तयारी  केली होती. शाळा सुरु झाल्यानंतर शाळेची भीती दूर करण्याचे आणि अभ्यासात मागे पडलेल्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना मेहनत घ्याली लागणार आहे. काही शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्यात आला.

दोन वर्षांचा कोरोना संकट आणि त्यानंतरची उन्हाळी सुट्टीनंतर संपल्यानंतर आजपासून नागपुरात सर्व अनुदानित शाळा सुरु झाल्या. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या.त्यानंतर मागील शैक्षणिक सत्रात जेमतेम नावापुरते विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच आजपासून शाळांचे नियमित शैक्षणिक सत्र सुरु झाले. अनेक महिन्यानंतर शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ, काही चिमुकल्याच्या शाळेचा पहिलाच दिवस, तर काहींना सुट्टी संपल्याची हुरहूर अशा वेगवेगळ्या भावनेतून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा अनेक शाळांनी स्वागत केला. कुठे प्रवेशोत्सव साजरा झाला, तर कुठे चॉकलेट आणि पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा स्वागत झाला.

           नूतन भारत विद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम

Vidarbha Schools : सुरु झाल्या ऑफलाईन शाळा; फळ्यावर चालला खडू अन् बाकांवर गर्दी

नूतन भारत विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीवर घेऊन गेले. त्यांच्याकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून घेत अभिनव पद्धतीने शाळेच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात केली. शाळेचे शेकडो विद्यार्थी पायी चालून दीक्षाभूमीवर पोहोचले आणि बाबासाहेबाना वंदन करत बाबासाहेबांनी रचलेल्या संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन केले.

गोंदिया जिल्ह्यात आजपासून वाजली सोळाशे शाळांची घंटा

गोंदियाः कोरोनाच्या संकटानंतर या वर्षीचे शैक्षणिक सत्र प्रत्येक्षात विदर्भात आजपासून सुरू झाले असून गोंदिया जिल्ह्यातील 1663 शाळांची घंटा आज वाजली असून शाळेचा पहीला दिवस विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाने साजरा करण्यात आला. तर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेची सजावट सुद्धा करण्यात आली .शाळेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटानंतर पहील्यांदाच शाळा सुरू झाल्याने शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता.अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे बलून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यातील सव्वातीन हजार शाळां पुन्हा गजबजल्या

यवतमाळ : यंदा कोविड संसर्ग कमी झाल्याने शाळा वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज 29 जूनला  शाळेची पहिली घंटा वाजली असून, कोविड नियम पाळले जाणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक आणि आश्रमशाळा अश्या तीन हजार 333 शाळा आजपासून सुरू झाल्याची  माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी दिली. शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यास शाळेच्या वेळेत बदल होईल. शालेय पोषण आहार शिजवला जाणार नाही. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अशा प्रकारे काळजी घेऊन शाळा सुरू राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अंघोळीसाठी धरणात उतरणं बेतलं जीवावर, वर्ध्यात चारपैकी दोन जणांचा बुडून मृत्यू
धक्कादायक! अंघोळीसाठी धरणात उतरणं बेतलं जीवावर, वर्ध्यात चारपैकी दोन जणांचा बुडून मृत्यू
Zim vs Ban Test : झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! WTC मध्ये 4 नंबरवर असलेल्या टीमला एका डावाने चारली धूळ; नोंदवला ऐतिहासिक विजय
झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! WTC मध्ये 4 नंबरवर असलेल्या टीमला एका डावाने चारली धूळ; नोंदवला ऐतिहासिक विजय
मुंबईत पावसाचा जोर वाढला, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद, तर भिवंडीसह पालघरमध्येही मुसळधार पाऊस
मुंबईत पावसाचा जोर वाढला, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद, तर भिवंडीसह पालघरमध्येही मुसळधार पाऊस
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
Embed widget