एक्स्प्लोर
Advertisement
भाजप आमदाराच्या उपस्थितीत अधिकाऱ्याला मारहाण, वारीसाठी बस सोडण्यास उशीर झाल्याचा दावा करत गुंडगिरी
भारतीय जनता पक्षासाठी आतापर्यंत केवळ वाचाळवीर आमदार, खासदार डोकेदुखी ठरत होते. परंतु दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर थेट कायदा हातात घेत दादागिरी करणारे किंवा गुंडगिरी करणारे नेते भाजपसाठी डोकेदुखी ठरु लागले आहेत.
बुलडाणा : भारतीय जनता पक्षासाठी आतापर्यंत केवळ वाचाळवीर आमदार, खासदार डोकेदुखी ठरत होते. परंतु दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर थेट कायदा हातात घेत दादागिरी करणारे किंवा गुंडगिरी करणारे नेते भाजपसाठी डोकेदुखी ठरु लागले आहेत. आज (बुधवार) भाजप आमदार आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत एसटी आगार व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली.
बुलडाण्य़ातील खामगाव एसटी आगारात हा प्रकार घडला. ज्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली त्याच्या मनमानी कारभाराला वैतागून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे बोलले जात आहे. परंतु आमदारांच्या उपस्थितीत आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात का घेतला? मारहाण करणाऱ्यांना आकाश फुंडकर यांनी रोखलं का नाही? मारहाणीला फुंडकर जबाबदार आहेत का? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement