एक्स्प्लोर

दबंग 3 च्या कमाईपेक्षा नागरिकता कायद्याविरोधी आंदोलन महत्वाचं : सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर स्टारर सिनेमा दबंग-3 नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होती. दबंग आणि दबंग-2 ला प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली होती, त्यामुळे दबंग-3 ची सर्वांना उत्सुकता होती.

मुंबई: देशात सध्या सुरु असलेली नागरिकता सुधारणा कायद्याची चर्चा ही दबंग 3 च्या ओपनिंग डे च्या कमाईपेक्षा जास्त महत्वाची आहे, असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने म्हटलं आहे.  सोनाक्षीने म्हटलं आहे की, आपण पाहतोय आज देशात काय सुरु आहे. माझं असं मत आहे की देशातील लोकांसाठी महत्वाचं काय आहे हे त्यांना चांगलंच कळतं. मी प्रामाणिकपणे सांगते की, दबंग 3 बाबत चाहत्यांच्या प्रेमाने मी खूप खुश आहे. मात्र यावेळी संपूर्ण देश नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात एकत्र आला आहे. आणि माझ्यासाठी हा मुद्दा चित्रपटापेक्षा अधिक महत्वाचा आहे, असे सोनाक्षीने म्हटलं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर स्टारर सिनेमा दबंग-3 नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होती. दबंग आणि दबंग-2 ला प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली होती, त्यामुळे दबंग-3 ची सर्वांना उत्सुकता होती. मात्र सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळाली नसल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट झालं आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेला गदारोळ या सर्वासाठी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाचा फटका दबंग -3 ला बसेल, असा अंदाज सिनेसृष्टीतील तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता. हेही वाचा - Dabangg-3 | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनांचा दबंग-3 ला फटका दबंग-3 सिनेमाला 24.50 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. दबंगच्या पहिल्या दोन सिनेमांपेक्षा ही ओपनिंग अधिक आहे, मात्र सर्वांचा यापेक्षा जास्त अपेक्षा होती. 2010 साली रिलीज झालेल्या दबंग सिनेमाला 14.50 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त र 2012 साली आलेल्या दबंग-2 सिनेमाला 21.10 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त्यामुळे दबंग-3 ला तुलनेने यापेक्षा चांगली ओपनिंग मिळेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र तसं झालेलं दिसत नाही. 2019 मध्ये ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा दबंग-3 रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. यामध्ये पहिल्या नंबरवर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'स्टार' सिनेमा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर सलमानचा भारत सिनेमा आहेत. तर तिसऱ्या स्थानावर मिशन मंगल आहे. वॉरने पहिल्याच दिवशी 53.35 कोटींची कमाई केली होती. भारतने 42.30 कोटींची कमाई केली होती. तर मिशन मंगलने 29.16 कोटींची कमाई केली होती. दबंग सिनेमाचं बजेट जवळपास 100 कोटी रुपये आहे. या आठवड्यात सलमानच्या दबंग-3 ला टक्कर देण्यासाठी एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र पुढच्या आठवड्यात अक्षय कुमार, करिना कपूरचा गुड न्यूज सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे गुड न्यूज सिनेमाचा परिणाम दबंग-3 वर निश्चित पडू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 October 2026: आजचा शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Mumbai Art Gallery : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
China Border Tension : भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...
भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget