Chandrakant Patil : सोलापुरात (Solapur) भर पावसात सुरु असलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाली आहे. मात्र, चंद्रकांत पाटील इतके का संतापले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंदिर पाडकामाच्या मुद्यावरुन चंद्रकांत पाटील आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
मंदिर पाडकामाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मंदिर पाडल्याचा जाब चंद्रकांत पाटील हे फोनवर समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीस विचारत आहेत. पण प्रकरण नेमकं काय? कशामुळं चंद्रकांतदादा इतके आक्रमक होते, याचे उत्तर मात्र मिळाले नाही. मी विद्यार्थी चळवळीतून आलोय, तुम्ही माझा रुप बघितलंच नाही. जिथं जिथं अन्याय होतो तिथं मी आक्रमकपणे मांडतो. सरकारमध्ये असून सुद्धा मांडतो अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय?
काय करणार आहात सांगा तुम्ही मला, नायतर इथून निघावं लागेल मला
तुम्ही सगळ्यांनी मिळून मंदिर बांधून द्या, नाहीतर मी येतो तिथे
मी राज्याचा मंत्री, एक सिनियर मिनिस्टर, एक्स पालकमंत्री आहे, तुम्ही परस्पर निर्णय घेताय
तुम्ही का सांगितलं नाही की आम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही
तुम्ही झालेली चूक सुधारा
असा संवाद मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, नेमकं प्रकरण काय आहे याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
महिलांच्या कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन, चंद्रकातं पाटलांनी केलं भर पावसात भाषण
सोलापुरातील (Solapur) रामवाडी परिसरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थित महिलांच्या कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी अचानक वादळी वारा आणि पाऊस आल्यानं मांडवाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तुफान वादळी वाऱ्यामुळे मंडप उडून गेल्याची घटना घडली. मात्र, अशा वातावरणात देखील महिला बसूनच राहिल्याने मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील भर पावसात भाषण केलं. तसेच भर पावसातच चंद्रकांत पाटील यांनी काही लोकांचा सन्मान देखील केला. कुठलीही निवडणूक नसतानाही मी पावसात भाषण केल्याचे पाटील म्हणाले.
वादळी वाऱ्यानं मंडप उडून गेला तरी कार्यक्रम सुरुच ठेवला. त्यामुळं चंद्रकांत पाटील हेदेखील व्यासपीठावर बसूनच होते. अचानक याठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले होते. यानंतर व्यासपीठावरील आणि समोर उभा केलेला मंडप उडून गेला. यानंतर पावसाला देखील सुरुवात झाली. अशा स्थितीतच चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले.
महत्वाच्या बातम्या: