Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर माढा (Madha) मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार पक्षाचे आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) आणि त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला मुंबईतील पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की, आमदार बबनदादा शिंदे यांच्या मनात काय आहे? हे अजून मला माहिती नाही. मात्र, आमदार बबनदादा शिंदे हे शरद पवार गटात प्रवेश करणार का? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


सध्या,माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे अजित पवार यांच्या पक्षात आहेत. मात्र, स्थानिक माढा मतदारसंघातील समीकरण पाहता आगामी विधानसभेत आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार पक्षाकडून पुत्र रणजित शिंदे यांना उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, सातत्याने भूमिका बदलल्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे बंधूंना स्थानिक मतदार किती पाठिंबा देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.


माढा विधानसभा मतदारसंघात तुतारीकडून इच्छुकांची संख्या वाढली  


सध्या माढा विधानसभा मतदारसंघाची राज्यभर चर्चा होत आहे. माढा मतदारंसघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. मात्र, मागील काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे यावेळी माढा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी आमदार बबनदादा शिंदे प्रयत्न करत आहे. एकतर तुतारीकडून रणजित शिंदे निवडणू लढवतील नाहीतर अपक्ष निवडणूक लढवतील अशी भूमिका बबनदादा शिंदे यांनी मागील चार दिवसापूर्वी मांडली होती. त्यामुळं शरद पवार आता रणजित शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी देणार का? याची चर्चा सुरु आहे. कारण माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवड़णूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये अभिजीत पाटील, अॅड मिनल साठे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, धनराज शिंदे यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यामुळं माढ्यात ट्वीस्ट निर्माण झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरातील बंड शमले; बारलोणीत तिघेही भाऊ एकाच स्टेजवर