एक्स्प्लोर

Mahavitaran Strike : सरकारी कंपन्या अदानी अंबानींच्या घशात घालण्याचा डाव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कर्मचाऱ्यांना पाठिंबा

महावितरणच्या खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात विविध ठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. पंढरपूरमध्येही कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला आहे.

Mahavitaran Strike Pandharpur : आज राज्यभर महावितरणच्या (Mahavitran) अधिकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. महावितरणच्या खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात विविध ठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. पंढरपूरमध्ये (Pandharpur) देखील महावितरणचे कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatana) पाठिंबा दिला आहे. आंदोलस्थळी उपस्थित राहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

खासगीकरणामुळे राज्यातील सर्व वीज ग्राहकांसह कर्मचारी अडचणीत येऊ शकतात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार महावितरण कंपनीच्या खासगीकरण विरोधात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आज पाठिंबा दिल्याची माहिती 
पंढरपूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिली. देशातील सर्व महत्त्वाच्या सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील अदानी अंबानींच्या घशात घालण्याचा डाव या सरकारचा आहे. खासगीकरणामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व वीज ग्राहक व कर्मचारी अडचणीत येऊ शकतात. कारण jio कंपनी सुरु झाली तेव्हा BSNL सह इतर मोबाईल कंपन्या अडचणीत येईपर्यंत jio ने डाटा फुकट दिला. त्यामुळं सर्व मोबाईल वापरकर्त्यानी jio चे sim card घेतले व त्यानंतर जे jio कंपनी ने रिचार्ज चे दर वारेमाप वाढल्याचे सचिन पाटील म्हणाले.

72 तासात तोडगा निघाला नाहीतर 18 जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा

महावितरणचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याला वीज वितरण कंपनीच्या संघर्ष समितीने विरोध केला आहे. दखल न घेतल्यामुळं संघटनेने 72 तासाचा संप पुकारला आहे. सोलापूर जिल्ह्यात ठिक ठीकानी  आंदोलनाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अदानी गो बॅक गो बॅक, खासगीकरण रद्द करा रद्द करा अशा प्रकारची घोषणाबाजी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळं एमएसईबी कार्यालय परिसर दणाणून गेला आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत. पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या 72 तासाच्या आंदोलनात तोडगा निघाला नाही तर 18 जानेवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

सकाळपासूनच राज्यभरात महावितरण कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली आहे. अदानी अंबानी यांच्यासह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. या संपामुळं अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. शासकीय कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी देखील वीज गायब झाल्यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

Mahavitaran Strike: लातूर जिल्ह्यात वीज कर्मचारी संपाचा नागरिकांना फटका; अनेक ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडित


 

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget