सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यात ( Solapur News)    एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटीचा (ST Accident)  अपघात झाला आहे.  सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. टेंभुर्णी - कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ  एसटीला अपघात झाला आहे.  चालकाला  फिट आल्याने चालकाल फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज  आहे.  या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली.


समोर आलेल्या माहितीनुसार ,  टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना  अपघात झाला.  एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी होते.  कुर्डूवाडी  डेपोची बस ही वैरागवरुन स्वारगेटकडे जात असताना पिंपळनेर नजीक पलटी झाली. या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले आहेत. एस्टी बसच्या चालकाला फीट आल्याने दुर्घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना  बाहेर काढून शेतात बसवण्यात आले. तर काही जखमींना कुर्डुवाडी येथील  शासकीय रुग्णालयात दाखल  करण्यात  आलं  आहे 


दैव बलवत्तर म्हणून चालकासह सर्वजण सुखरुप बचावले


एसटी चालकाला फीट  आल्यामुळे बस शेतात घुसली. पिंपळनेर नजीक  आल्यानंतर एसटी चालकाला फीट  आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि त्यामुळे ही  बस रस्ता सोडून कडेला गेली.. चालकाला काही सुचण्याच्या आधीच ती थेट शेतात घुसली  थोड्या अंतरावर गेल्यानंतर एसटी उलटली. या प्रकारामुळे एसटीत असलेले  प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते.  मात्र कोणालाही गंभीर  इजा झाली नाही अथवा जीवितहानी झाली नाही.सुदैवाने हा अपघात कमी रहदारीच्या ठिकाणी  घडला. अन्यथा   मोठा अनर्थ ओढवला असता. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने नंतर तिरक्या दिशेने निघालेली बस मोकळ्या शेतात गेली. त्याऐवजी बाजूला झाडाला धडकली असती तरीही गंभीर प्रसंग ओढवला असता.  दैव बलवत्तर म्हणून चालकासह सर्वजण सुखरुप बचावले आहेत.


बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर


एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन महामंडळाची बस रस्त्यावर धावते. परिवहान महामंडळाच्या बसला नागरिकही लाल परी आपली हक्काची म्हणून पसंती देतात. मात्र, गेल्या काही दिवसांत बस अपघातातही वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेकदा, या बस अपघातांना बसची दूरवस्था कारणीभूत असल्याचेही दिसून येते. पावसाळ्यात चक्क बसच्या टपांमधून पाणी गळत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे, रस्त्यावर धावणाऱ्या बसची आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे.   


 हे ही वाचा :


वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात! विठूरायामुळे मोठा अनर्थ टळला; चालक- वाहकावर निलंबनाची कारवाई