(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gram Panchayat election : सोलापुरात काँग्रेसचा धुव्वा, भाजपचं वर्चस्व; ठाकरे गटाचा 4 तर शिंदे गटाचा एका ग्रामपंचायतीत विजय
Solapur gram panchayat election 2022 Result : सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे.
Solapur gram panchayat election 2022 Result : सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. तर सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाला केवळ 1 जागावर समाधान मानवं लागलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आपला करिष्मा कायम ठेवत 4 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात मिळवल्यात. या निवडणुकात जनतेने 7 ठिकाणी स्थानिक आघाडीकडे आपल्या ग्रामपंचायतिचा कारभार हाती दिलाय. काँग्रेसचा गड राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे चित्र आहे
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये काय झालं?
करमाळा- 8
1) बिटरगाव वांगी
माजी आमदार नारायण आबा पाटील समर्थक (एकनाथ शिंदे गट)
2) सातोली :
शिवसेना (बागल गट)
3) आवाटी
स्थानिक आघाडी
4) वडशिवणे
बागल गट (शिवसेना)
5) वांगी नबंर १
राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे
6) वांगी नं.२
राष्ट्रवादी समर्थक गट
7) वांगी नंबर ३
राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे गट
8) भिवरवाडी
शिवसेना (बागल गट)
माढा :- 2
9) म्हैसगाव :राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे गट
10) पडसाळी : स्थानिक आघाडी
बार्शी :- 2
11) वांगरवाडी-तावरवाडी
राऊत गट
12) पानगाव
राऊत गट
मोहोळ- 1
13) सोहाळे
भाजप खासदार धनंजय महाडिक भीमा परिवार
पंढरपूर - 2
14) टाकळी
भाजप समर्थक
15) कोर्टी
स्थानिक आघाडी
माळशिरस :- 1
16) वाघोली : भाजप
मंगळवेढा- 4
17) संत दामाजी नगर : अपक्ष बबनराव अवताडे गट
18) संत चोखामेळा नगर : भाजप आमदार समाधान अवताडे
19) धर्मगाव
स्थानिक आघाडी
20) सलगर खुर्द
स्थानिक आघाडी
दक्षिण सोलापूर - 2
21) मनगोळी
स्थानिक आघाडी
22) चिंचपूर
शिवसेना उद्धव ठाकरे गट
अक्कलकोट - 3
23) वसंतराव नाईकनगर - आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
24) मंगरूळ - आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
25) कबडगाव - आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
सोलापूर जिल्हा
एकूण 25
शिवसेना - 4
शिंदे गट - 1
भाजप - 9
राष्ट्रवादी - 4
काँग्रेस - 0
स्थानिक आघाडी - 7