Solapur Fire: 'आपा, टेन्शन मत ले, मैं हूँ ना!' म्हणणारा सलमान गेला, बागवान कुटुंबाने शेवटपर्यंत मालकाची साथ सोडली नाही

Solapur News: रविवारी पहाटे तीन वाजता सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत आग लागली होती. तब्बल 15 तासांनी आग आटोक्यात आली. त्यासाठी पाण्याचे 60 हून अधिक बंब लागले.

Continues below advertisement

Solapur Fire news: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली होती. तब्बल 16 ते 17 तास ही आग धुमसत होती. या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या कंपनीत टॉवेल (Towel Factory) तयार करण्याचे काम व्हायचे. आगीत कंपनीचे (Solapur MIDC fire) मालक उस्मान मन्सुरी (वय 87) आणि कामगार मेहताब बागवान (वय 51) यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह मृत्यू झाला. मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चार जणांचा आगीत जीव गेला. यामध्ये मेहताब  सय्यद बागवान, आशाबानो मेहताब बागवान (वय 45), सलमान मेहताब बागवान (वय 26) आणि हिना वसीम शेख (वय 24) यांचा समावेश आहे. हिना शेख यांनी 15 दिवसांपूर्वीच आपल्या दोन मुलांना अहिल आणि आहाब यांना शिक्षणासाठी मदरशात पाठवल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, बागवान कुटुंबीयांचा आधार असलेल्या सलमानचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

Continues below advertisement

सलमान बागवान हा त्याच्या कुटुंबीयांचा लाडका होता. तो आपल्या बहि‍णींना नेहमी आधार द्यायचा. "आपा, टेन्शन मत ले, मैं हूँ ना!", असे तो कायम म्हणायचा. बहीण तस्लिमा हिच्यासाठी सलमान मोठा आधार होता. मात्र, आता आई-वडिलांसह सलमानचाही आगीत होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बागवान कुटुंबीय हे पूर्वी सोलापूर मार्केट यार्डजवळील सर्वोदयनगर येथे राहत होते. महताब बागवान त्याठिकाणी मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. नंतर मुलं मोठी झाल्यावर तीदेखील कामाला लागली. पुढे उस्मान मन्सुरी यांनी महताब बागवान यांना एमआयडीसीतील त्यांच्या कारखान्यात कामासाठी बोलावून घेतले. उस्मान मन्सुरी यांनी त्यांना राहण्यासाठी कारखान्यातच घर दिले होते. रात्री तीन वाजता आग लागल्यानंतर बागवान कुटुंबीय मालकांना वाचवण्यासाठी धावले. त्यांनी उस्मान मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने या नादात बागवान कुटुंबीयांचाही मृत्यू झाला होता. त्यांना जखमी अवस्थेत रात्रीच कारखान्यातून बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. तर अनेक तासांनी उस्मान मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले होते. या घटनेमुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

उस्मानभाईंनी जीवापाड जपलं, मेहताबभाईंनीही जीवाला जीव दिला; निष्ठा जपत अख्ख्या कुटुंबाने दिली आहुती

आईच्या कुशीतच 1 वर्षाच्या बाळाने जीव सोडला; आगीनं अख्ख सोलापूर हळहळलं, अग्निशमन जवानही गहिवरले

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola