पाकिस्तानच्या बिळात लपलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन ते लष्कर-ए-तोयबाच्या 'या' मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा; सविस्तर यादी आली समोर

पाकिस्तानच्या बिळात लपलेल्या अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आजवरच्या हल्ल्यातील हा साऱ्यांची नावे समोर आली असून हे टॉप दहशतवादी नेमके कोण? हे जाणून घेऊ

Pakistan most wanted terrorists

1/8
अलिकडच्या काळात भारताचे मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यापासून खोऱ्यात दहशत पसरवणारे अनेक वरिष्ठ दहशतवादी कमांडर यामध्ये समाविष्ट आहेत.
2/8
हाफिज सईदचा जवळचा सहकारी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कताल याला 15 मार्च 2025 रोजी पाकिस्तानमध्ये मारण्यात आले. अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली.
3/8
हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर बशीर अहमद पीर, ज्याला इम्तियाज आलम म्हणूनही ओळखले जाते. 20 फेब्रुवारी 2023 रोजी रावळपिंडी येथे त्यांची हत्या करण्यात आली. काश्मीरमधील दहशतवादी घटनांसाठी पीर जबाबदार मानला जात असे. तो 15 वर्षांपासून पाकिस्तानात राहत होता.
4/8
लाहोरमध्ये खलिस्तान कमांडो फोर्सचे नेते परमजीत पंजवार यांची 6 मे 2023 रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.
5/8
पाकिस्तानातील सियालकोट येथे जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाहिद लतीफ याची 11 ऑक्टोबर 2023 रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. लतीफ हा 2016 मध्ये पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.
6/8
जम्मू येथील रहिवासी अबू कासिम काश्मिरी यांची पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये 8 सप्टेंबर 2023 रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. जम्मूतील राजौरी येथील हल्ल्यातील मुख्य आरोपी अबू कासिम होता.
7/8
पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप दहशतवादी रियाज अहमद याची 8 सप्टेंबर 2023 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
8/8
लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरमीत सिंगची 27 जानेवारी 2020 रोजीगोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Sponsored Links by Taboola