Devendra Fadanvis:  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा दोनवेळा रद्द झालेला दौरा अखेर गुरुवारी पार पडला आहे. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकासकामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा फडणवीसांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सोलापुरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळं सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनच्या कामाला गती देण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या दौऱ्यात दिलं. सोलापूरच्या विमानसेवेच्या प्रश्नावरही सोलापूरकरांच्या मनासारखा निर्णय होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. 


तसेच सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी शहरातल्या भाजप संघटन बांधणीचं कामही आपल्या दौऱ्यात केलं.देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाट्न पार पडले.  तसेच या कार्यलायाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून 25 टक्के काम बाकी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे या कार्यलयाचं लवकरात लवकर 100 टक्के काम पूर्ण करुन घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री राधा कृष्ण विखे-पाटील यांना दिले आहे.  तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सुशोभित करण्यात आलेल्या वास्तूचे लोकार्पण देखील करण्यात आले. तसेच त्यांनी सोलापुरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक देखील घेतली. या बैठकीत त्यांनी 'मुख्यमंत्री सौरवाहिनी' या योजनेचा देखील आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत दिवसा बारा तास शेतकऱ्यांना वीज पुरवण्यात येणार आहे. तसेच यासंबंधी गती देण्याचे देखील उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.  तसेच त्यांनी सोलापूरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना संबोधित देखील केले. 


15 दिवसांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार



विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ कसा लाभ मिळेल हा प्रयत्न सरकार करत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. सध्या सोलापुरात सध्या जवळपास 167 गावांमध्ये जलयुक्त शिवार दोनच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या दौऱ्यात सांगितलं. तसेच सोलापूरच्या विमानसेवेबाबत देखील सरकार सकारात्मक असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. सोलापूरचा पाणी प्रश्न देखील लवकरच सोडवला जाईल असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. 


झोपडपट्टीवासियांना दिलासा देणारा निर्णय


राज्य शासनानं मुंबईसह विविध महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झोपडपट्टीवासियांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एक जानेवारी 2000 ते एक जानेवारी 2011 या कालावधीतल्या झोपडपट्टीधारकांना केवळ अडीच लाखांच्या मोबदल्यात पक्कं घर मिळणार आहे.गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार एक जानेवारी 2000 ते एक जानेवारी 2011 या अकरा वर्षांच्या कालावधीत अस्तित्वात असलेल्या झोपड्यांमधून राहणाऱ्या नागरिकांचं सशुल्क पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडपट्टीधारकांना पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.यासंदर्भात आवश्यक त्या अटीशर्ती मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाच्या पूर्वमान्यतेनं निश्चित कराव्यात, असं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र बदलणार, 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ