एक्स्प्लोर

सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं, ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं आहे.

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Shirish Valsangkar) यांनी स्वतःवर झाडून घेत जीवन संपवलं. प्राथमिक माहितीनुसार दोन राउंड फायर झाल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेली. मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.या घटनेमुळं सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  शहरातील नामांकित रुग्णालय वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरुन रात्री 8.30 च्या सुमारास स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धवस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी असल्यानं यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. केवळ सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे.  त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केलं त्यांच्या त्याचं रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.. रुग्णालयात जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांनी आयसीयू बाहेर प्रचंड गर्दी केली

डॉ. शिरीष वलसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली. विज्ञानाची पूर्व-पदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि प्री-प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकतात.

शिरीष वळसंगकर यांची वैद्यकीय कारकीर्द 
1. अनिवार्य रोटरी इंटर्नशिप इंटर्न, सीपीआर हॉस्पिटल-कोल्हापूर (01/07/1978 ते 31/12/1978)
2. इंटर्न, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्डुवाडी (01/01/1979 ते 30/06/1979)
3. जनरल हॉस्पिटल, सोलापूर येथे तीन वर्षांचे पदव्युत्तर प्रशिक्षण (डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज-सोलापूर) अंतिम एमडी
4. निवासी वरिष्ठ रजिस्ट्रार (न्यूरोलॉजी विभाग) बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (शिक्षण न देणारे परंतु न्यूरोलॉजीमधील विशेषज्ञ प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यूरोलॉजी बोर्ड, नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त (07/05/1983 ते 22/12/1983).
5. लोकम कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट - बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (08/05/1983 ते 23/05/1983 आणि 10/11/1983 ते 20/11/1983).

6.एसपी इन्स्टिटयूट ऑफ न्युरोसायन्सेस, सोलापूरचे ते प्रमुख होते

दरम्यान डॉ.शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ. अश्विन आणि  सून  डॉ. सोनाली  हे दोघे ही न्युरोलॉजिस्ट आहेत.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
Embed widget