एक्स्प्लोर

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा, सांगोल्यात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकास पॉस्को अंतर्गत अटक 

Solapur Crime: घटना घडल्यानंतर तब्बल 18 दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. 

सोलापूर: शिक्षक आणि विद्यार्थी या गुरुशिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचे काम सांगोला तालुक्यातील कोला येथील एका शिक्षकाने केल्याचा प्रकार घडला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला पॉस्को कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील कोला येथील कोला विद्यामंदिर हायस्कुलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या शाळेमध्ये 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शाळेतील शिक्षक शत्रुघ्न भांगरे याने नववीत शिकणाऱ्या मुलीला स्नेहसंमेलन कार्यक्रम सुरु असताना कवितेची वही देण्यासाठी स्टेजमागील वर्गात बोलावले होते. ही मुलगी शिक्षकाकडे गेली असता त्याने या मुलीचा विनयभंग करताना शाळेतील एका शिक्षकाने पहिले देखील होते. या मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केली असता पालकांनी शाळेकडे विचारणा केली. 

ही घटना घडल्यानंतर 18 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक रफिक मणेरी यांनी सांगोला पोलिसात लेखी तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी या नालायक शिक्षकाला अटक केली असून त्याच्यावर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच शिक्षकाने यापूर्वी नाझरे येथील शाळेत काम करत असताना देखील एका मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मात्र संस्थेने त्याला लेखी खुलासा मागितला होता. आता पुन्हा याच शिक्षकाने विनयभंगासारखे गंभीर कृत्य करून देखील संस्थेने गुन्हा दाखल करण्यास इतका उशीर का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान, या मुलीच्या कुटुंबाच्या आणि गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाणे टाळण्यासाठी अखेर हा गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा आहे. तसं असलं तरी या शिक्षकांसोबत जर त्याला कोणी पाठीशी घालीत असेल तर त्याचीही चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget