एक्स्प्लोर

उजनी अपघाताची ए टू झेड कहाणी, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? 

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजनी धरणात (Ujjani Dam) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील परिसरात उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट बुडाल्याची घटना काल (21 मे) घडली आहे.

Boat capsizes in Ujjani Dam : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजनी धरणात (Ujjani Dam) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील परिसरात उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट बुडाल्याची घटना काल (21 मे) घडली आहे. यामध्ये सहा प्रवासी बुडाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी तब्बल  17 तासानंतर उजनी जलाशयात बुडालेली बोट 35 फूट पाण्यात तळाशी सापडली आहे. मात्र बुडालेले प्रवासी शोधण्यात अद्याप NDRF च्या जवानांना य़श आलं नाही. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली? उजनी अपघाताची आत्तापर्यंतची ए टू झेड कहाणी पाहुयात.

नेमकी घटना घडली कशी?

काल (21 मे) सायंकाळी डोंगरे व जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. हे सर्व प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटेत होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्यानं दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास 10 ते 15 मिनिटे सुरु होता. मात्र, जोराच्या वादळामुळं त्यांची झूंज अपयशी ठरली. अखेर पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली.

पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे पोहत पोहत पोहोचले नदीच्या काठावर

विशेष म्हणजे या बोटीतून ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे देखील प्रवास करत होते.  बोट पलटी झाल्यानंतर ते पोहत-पोहोत कळाशी गावच्या काठावर पोहोचले आहेत. राहुल डोंगरे हे काठावर पोहोचल्यांतर या घटनेचा उलगडा झाला आहे. 

NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली होती. अद्यापही शोध मोहिम सुरुच आहे. बोट जरी सापडली असली तरी अद्यापही प्रवाशी बेपत्ताच आहेत. NDRF कडून प्रवाशी शोधण्याचं काम सुरु आहे. 

बुडालेल्या प्रवाशांची नावे

गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय 35) व गौरव डोंगरे (वय 16). हे सर्व प्रवाशी बुडाले आहे. अजून यामधील कोणात्याही प्रवाशाचा शोध लागला नाही. जलाशयात बुडालेले सर्व 6 प्रवासी करमाळा तालुक्यातील आहेत. दरम्यान, बुडालेल्या प्रवाशांमध्ये आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे याचाही समावेश आहे. 
तसेच कुगावं येथील रहिवासी असलेला बोट चालक पाण्यात बेपत्ता आहेत .

खासदार रणजितसिंह निंबाळकर घटनास्थळी दाखल

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले आहे. ते देखील NDRF च्या टीमसोबत जलाशयात उतरले आहेत. NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. 

महत्वाच्या बातम्या:

उजनी धरणात बोट पलटली, 6 जण बुडाले, PSI पोहत-पोहत काठावर आले; रात्रीच्या अंधारात शोध सुरू

 

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं 5000 रुपयांची मदत जाहीर केली, पण 'या' गावातील एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही, नेमकं कारण काय? 
सरकारनं 5000 रुपयांची मदत जाहीर केली, पण 'या' गावातील एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही, नेमकं कारण काय? 
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! मतदान कुणाला केलं हे कळणार अशी मतदारांना दमबाजी सुरु, खासदार मोहिते पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! मतदान कुणाला केलं हे कळणार अशी मतदारांना दमबाजी सुरु, खासदार मोहिते पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Pandharpur: दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget