Shiv Jayanti 2024 : सोलापूर (Solapur) शहरात शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सोलापुरात शिवजन्मोत्सवाची सुरुवात पाळण्याने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पाळणा सोहळा उत्साहात पार पडला.


बाळ शिवाजीचा पाळणा सोहणात उत्साहात साजरा


या पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ मासाहेबांच्या सिंदखेड राजा येथील वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे, रायबा मालुसरे, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, महापालिका आयुक्त शितल उगले, धर्मदाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, यांच्यासह वीरपत्नी वर्षा श्रीहरी लटके, देवकी रत्नाकर हडपद, रेखा शावरेआपा नावी, सुरेखा जयहिंद पन्हाळकर, कांताबाई भोसले, रत्‍नाबाई बाबुराव चांदोडे, सुषमा दत्तात्रेय माने यांच्या हस्ते पाळणा उत्सव संपन्न झाला.


शेकडो पोलिसांचा तगडा बंदोबस्त


शिवाजी चौकामध्ये पाळणा कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निदर्शनाखाली शिवाजी चौकामध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


पारंपारिक वेशभूषा करत महिलांचा सहभाग


या भव्य पाळणा सोहळ्यासाठी महिलावर्ग नऊवारी साडी आणि पारंपारिक वेशभूषा करून शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती. शिवव्याख्याते दीपकराव करपे यांचे राजमाता जिजाऊ मासाहेब, वीरांगणा आणि लोकशाही मधील रणरागिनी, न उमजलेले छत्रपती शिवराय या विषयावरती रात्री दहा ते अकरा या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.


हा पाळणा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, सचिव प्रीतम परदेशी, खजिनदार अंबादास शेळके, ज्येष्ठ ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बरडे ,राजन जाधव, शिवाजीराव घाडगे, (गुरुजी) दिलीप कोल्हे, विक्रांत (मुन्ना) वानकर, अनिकेत पिसे, नागेश  ताकमोगे, प्रभाकर रोडगे, शिवकुमार कामाठी, प्रकाश ननवरे, ज्ञानेश्वर सपाटे, बजरंग जाधव, महादेव गवळी, विवेक फुटाणे, चंद्रशेखर सुरवसे, अमोल केकडे, विनोद भोसले यांच्यासह उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, खजिनदार सुशील बंदपट्टे, कार्याध्यक्ष रवी मोहिते, उपाध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले, अंबादास सपकाळे, दिलीप बंदपट्टे, नागेश यलमेळी, मनीषा नलावडे, लता ढेरे, सचिन तिकटे, गणेश माळी, महेश धाराशिवकर, नामदेव पवार, बापू जाधव, अमर दुधाळ, वैभव गंगणे, बसू कोळी, सचिन स्वामी, देविदास घुले, प्रभाकर भोजरंगे यांनी परिश्रम घेतले.