पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे तीव्र चटके बसू लागले असताना पावसाने (Monsoon) पूर्णपणे पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी (Farmers) संकटात सापडले आहेत. आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंढरपूर-सातारा रोडवर (Pandharpur-Satara Road) उपरी येथे रास्ता रोको आंदोलन (Farmers Protest) करत संताप व्यक्त केला. उजनी धारण जरी 13 टक्क्यावर असले तरी धरणात अजून 70 टीएमसी पाणी आहे. त्यामुळे तातडीने कालवा आणि नदीमधून पाणी सोडून आमची पिके वाचवा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येना शेतकरी सामील झाले होते.
'उजनी धरणातून शेतीला पाणी सोडा'
सध्या उजनी धरणात तीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत असून आता नदीतून सहा टीएमसी आणि कालव्यातून पाच टीएमसी पाणी तातडीने सोडल्यास आमची पिके वाचतील. याशिवाय जनावरांना चार आणि पाण्याची सोय होईल, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बायका पोरे आणि जनावरांसह घुसू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि समाधान फाटे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जनावरं सोडण्याचा 'स्वाभिमानी'चा इशारा
आज सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरु केलं. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दोन्ही बाजूला शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता धरणातील पाणी सोडण्याचा तातडीने निर्णय न झाल्यास होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार असेल, असे सांगत याची नुकसान भरपाई शासनाकडून वसूल करण्यासाठी न्यायालयात जाऊ असा इशारा समाधान फाटे यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना यासह विरोधी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी
सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागात तुरळक ठिकाणा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी खरीपाच्या पिकांनी माना टाकालया सुरुवात केली. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातही पावसानं दडी मारल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो ताबडतोब सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासह शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पी व्ही सगर यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :