सोलापूर : सध्या सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची भीषण परिस्थिती होत असून कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोला येथेही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. सांगोला (Sangola) हा पूर्वीपासून कायम दुष्काळी तालुका म्हणून याची ओळख आहे. त्यामुळेच सध्या टेम्भू ,ताकारी अशा विविध योजनांतून सांगोल्याला पाणी देण्याचे प्रयत्न होत असतात. मात्र 125 वर्षांपूर्वी याच सांगोल्याला पाणी देण्यासाठी राणी व्हिक्टोरिया यांनी विशेष प्रयत्न करत थेट सातारा जिल्ह्यातील राजेवाडी तलावाचे पाणी सांगोल्यातील कटफळ तलावात आणण्यासाठी खास अशी पाट पद्धत वापरली होती. विशेष म्हणजे आज  125 वर्षांनंतरही आजही हीच पाट पद्धतीचा वापर केला जात आहे . 


सांगोला परिसरातील शेतकरी भुईमुगाच्या शेंगाचे पीक घ्यायचे सांगोल्यातील पसऱ्या अर्थात लांबलचक टपोऱ्या शेंगा या राणीला आवडत असे. तसेच येथील रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी राणी नेहमीच सांगोला परिसरात येत असत. त्यामुळे राणीसाठी राजेवाडी तलाव , सांगोल्यातील बुद्धेहाळ तलाव आणि महूद या ठिकाणी राणीसाठी खास ब्रिटिश पद्धतीचे विश्रामगृहे बांधण्यात आली होती. सांगोला भागातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळत नसल्याने राणीने थेट राजेवाडी तलावातून सांगोला तालुक्याच्या सीमेवरील कटफळ तलावात सोडण्यात आले होते. हा सगळं भाग उंचावर असल्याने गरजेनुसार थेट 50 ते 60 फूट खोल खोदून पाट खणण्यात आले होते. दोन डोंगरांमधून खोल पाटातून हे पाणी आणण्यात येत होते. एके ठिकाणी जास्त उंची असल्याने या ठिकाणी त्याकाळी थेट  किलोमीटर लांबीचा बोगदा खणून हे पाणी पुढे नेण्यात आले होते . 


125 वर्षांपूर्वी खोदलेला हा बोगदा स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असून इतक्या खोलीवर एवढा लांब बोगदा तयार करून पाणी नेणे हे त्याकाळी एक आव्हान होते . हा बोगदा खणताना तीन ठिकाणी खाली उतरायला जागा ठेवण्यात आली आहे. आजही इतक्या खोल उतरून या बोगद्यापर्यंत पोहचणे कठीण असताना या खोलीवर उतरून हा बोगदा बनविण्यात आला होता. इतक्या खोलीवर पाट आणि बोगदा करण्याचा दुसरा उद्देश तलावातून सोडलेल्या पाण्यासोबत या पातळ आणि बोगद्याला जिवंत झऱ्यांचे पाणी मिळावे असा होता. आजही सांगोल्यातील सर्व तलाव कोरडे पडले असताना या बोगद्यात झऱ्याचे पाणी असल्याचे दिसून येते . सध्या याच  बोगद्याच्या वापर म्हसवड कालवा म्हणून वापरात येत असला तरी केवळ शेंगांच्या प्रेमासाठी राणी व्हिक्टोरिया यांनी  तालुक्यात केलेले जलसिंचनाची कामे आजही सांगोला तालुक्याला वरदान ठरत आहेत.


हे ही वाचा :